प्राध्यापकाच्या घरी पडलेल्या दरोड्याच्या तपासात पोलिसांना अपयश

प्राध्यापकाच्या घरी पडलेल्या दरोड्याच्या तपासात पोलिसांना अपयश

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) शहरानजीकच असलेल्या बोंबले वस्तीवर प्राध्यापकाच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा (Robbery at the Professor House) तपास पाच दिवस उलटूनही लागू शकला नाही. याबाबत पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी संताप व्यक्त (Citizens Express Outrage) केला आहे. केवळ तपास चालू आहे या नावाखाली पोलीस (Police) नागरिकांची दिशाभूल करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

बेलापूर (Belapur) येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक विठ्ठल बाबासाहेब सदाफुले यांच्या ऐनतपूर शिवारातील श्रीरामपूर (Shrirampur) शहरालगत बोंबले वस्ती येथे शिक्षक कॉलनीतील घरी चोरट्यांनी दरोडा टाकुन घरातील सोने, रोख रक्कम अन्य वस्तु मिळुन सुमारे सहा लाखांचा ऐवज लुटुन नेला.

या घटनेस आज पाच दिवस उलटूनही पोलीस तपासात प्रगती करु शकले नाहीत. या अगोदरही निपाणीवडगाव येथील माजी उपसरपंचाच्या घरावर दरोडा पडला होता. त्याचाही तपास लागू शकला नाही. तसेच एसटी स्टँड शेजारीच असलेलले मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी एक लाखाहून अधिक ऐवज चोरुन नेला होता. मात्र यातील दोन घटनांना एक महिन्याच्या आसपास कालावधी लोटलेला असतानाही त्याचाही तपास करता आला नाही. साधे धागेदोरेही मिळून आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत पोलिसांना (Police) विचारले असता या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. लवकरच तपास लागेल असे सांगितले जाते. या दरोड्यामुळे प्राध्यापकांच्या कुटुंबातील सदस्य घाबरलेले असून चोरट्याचा तपास तातडीने लावावा, अशी मागणीही करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com