रात्रीच्यावेळी लुटणारे चौघे अटकेत

कोतवाली पोलिसांची कामगिरी || चौघे भिंगारचे
रात्रीच्यावेळी लुटणारे चौघे अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागरिकांना मध्यरात्री गाठून लुटणारी टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे. विशाल बाबासाहेब गायकवाड, अतुल राम नन्नवरे, सोमेश पवन साळवे, अविनाश अशोक शेलार (सर्व रा. भिंगार) अशी जेरबंद केलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

अमित विलास तोरकडी (रा. धांदरफळ ता. संगमनेर) हे व त्यांचा मेव्हणा प्रविण कोल्हे असे दोघे संगमनेर येथून शिखर शिंगणापुर येथे जाण्यासाठी त्यांचे कडील दुचाकीवरून नगर मार्गे जाणे करीता निघाले असताना माळीवाडा बस स्थानक परिसरात मंगळवारी (दिनांक 11 एप्रिल) त्यांना चौघांनी आडवले. अमित यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल फोन हा बळजबरीने काढूून घेतला व चौघे पळून गेले होते. यासंदर्भात अमित यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदरचा गुन्हा भिंगार येथील राहणार्‍या चौघांच्या टोळीने केल्याची माहिती कोतवाली पोलिसांकडे प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोसइ शितल मुगडे, पोसइ नोज महाजन, मनोज कचरे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, सतीश भांड, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, इसराईल पठाण, अतुल काजळे, भरत गाडीलकर, प्रशांत बोरुडे, याकूब सय्यद यांच्या पथकाने चौघांना कल्याण रोड परिसरातून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com