जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस नेवासा पोलीसांनी मुद्देमालासह केली अटक

पाच दिवसांची पोलीस कोठडी
जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस नेवासा पोलीसांनी मुद्देमालासह केली अटक

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस नेवासा पोलीसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, फिर्यादी ज्ञानदेव यशवंत बर्डे (रा. भातकुडगाव ता. शेवगाव) हे दि.17 ऑक्टोबर 2021 रोजी कामानिमित्त पाचेगाव येथे आले होते. तेथुन भातकुडगाव ता-शेवगाव येथे जाण्यासाठी सायंकाळी 7 वा सुमारास नेवास बस स्टॅण्ड समोर गाडीची वाट बघत असतांना यातील आरोपी यांनी त्यांना लिप्ट देवुन नेवासा फाटा येथे जात असतांना काझीनगर येथे फिर्यादीस बळजबरी घेवुन जावुन चॉपर लावुन फिर्यादीकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकुण 19 हजार 500 रुपये किंमतीचा ऐजव बळजबरीने चोरुन नेला होता. सदर प्रकाराबाबत नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 790/2021 भादवी 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांनी गुन्हा तपासाच्या अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. गुन्हा घडले पासुन आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवुन फिरत होता.

अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक पुराव्या अनुषंगाने निष्पन्न आरोपी रॉकी रमेश चांदणे (वय 23 वर्षे रा-लक्ष्मीनगर नेवासा) त्यांचे राहते घरातुन ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली. फिर्यादीचा मोबाईल आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला असुन आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दि.07 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोना भागवत शिंदे, पोकॉ अंबादास गिते यांचेसह अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमचे पोना फुरकान शेख यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com