
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1, रमानगर या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मोटारसायकलसह 1 लाख 12 हजारांचे सोन्याचे दागिने लूट करणार्या दोघा जणांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी चार तासांच्या आत अटक केली.
यामाहा कंपनीची लाल रंगाची मोटरसायकल, अॅपल कंपनीचा आय फोन, 1,200 रुपये रोख रक्कम, चांदीचे 3 भाराची चेन व ब्रेसलेट, आधारकार्ड व पॅनकार्ड व एक चाकू असा 1 लाख 10 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या दोघांना काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रस्त्याने मोटारसायकलवरून जाणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला गाडी थांबवून त्याच्या गळयाला चाकू लावून त्यांचा मोबाईल, खिशातील रक्कम, ब्रासलेट, चेन असा 1 लाख 12 हजार रुपयांचा ऐवजासह यामाहा कंपनीची एफझेड मोटारसायकलही लुटून नेली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काल सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी श्रीरामपूर शहरात असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक़ राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक़ स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक़ संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस नाईक रघुनाथ कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, राहुल नरवडे, रमिझराजा आतार, गणेश गावडे, मच्छिंद्र कातखडे, भारत तमनर पोलीस नाईक फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव या पथकाने संजय नगर व बिफ मार्केट परिसरात सापळा लावून दोघांंना सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. त्यावेळी त्यांची नावे विचारले असता अरबाज इजाज बागवान (रा. संजयनगर वॉर्ड नं. 2), सर्फराज बाबा शेख (रा. बीफ मार्केट, वॉर्ड नं. 2) असे सांगितले.
पोलिसांनी त्यांच्याकडून यामाहा कंपनीची लाल रंगाची मोटरसायकल, अॅपल कंपनीचा आय फोन, 1,200 रुपये रक्कम, चांदीची चेन व ब्रेसलेट, असा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यातील आरोपी अरबाज इजाज बागवान व सर्फराज बाबा शेख यांचेविरुध्द श्रीरामपूर, लासलगाव पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांना काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.