सराईत दरोडेखोरांच्या टोळीतील तिघे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची करमाळ्यात कारवाई
सराईत दरोडेखोरांच्या टोळीतील तिघे जेरबंद
जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीगोंदा, कर्जत तालुक्यासह नगर शहरात घरफोड्या, दरोडा टाकणार्‍या करमाळाच्या (जि. सोलापूर) टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. राजश्री ऊर्फ रासर सिकंदर्या काळे (वय 45), प्रमोद राजश्री ऊर्फ रासर काळे (वय 19), मेघराज राजा काळे (वय 20 तिघे रा. भगतवाडी ता. करमाळा जि. सोलापूर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोने, लोखंडी कत्ती, मोबाईल असा 17 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

7 मे च्या रात्री दीपक भरत मोरे (रा. खेड ता. कर्जत) यांच्या घरी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना सदरचा गुन्हा रासर काळे याने केल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. निरीक्षक कटके यांनी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पथके नियुक्त करून आरोपींना करमाळा तालुक्यातून जेरबंद केले. याच टोळीतील अजून तिघे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. आरोपी विरोधात जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, तोफखाना पोलीस ठाण्यासह करमाळा, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com