दरोड्याच्या तयारीत असलेले तीन जण गजाआड

घोरपडवाडी घाटातील घटना || चौघे पसार, एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत
दरोड्याच्या तयारीत असलेले तीन जण गजाआड

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी ताहराबाद रोडवर असलेल्या घोरपडवाडी घाटात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर राहुरी पोलीस पथकाने पहाटेच्या दरम्यान छापा टाकला. त्यावेळी तिघांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. तर चार जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.

30 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाला गुप्त खबर मिळली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे, हवालदार हनुंमत आव्हाड, पोलिस शिपाई सचिन ताजणे, नदीम शेख, अमोल पडोळे, अंकुश भोसले आदिंच्या पोलिस पथकाने राहुरी ताहराबाद रोडवर असलेल्या घोरपडवाडी घाटात छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसले होते. पोलिस पथकाला पाहून ते पळू लागले. त्यावेळी पोलिस पथकाने पाठलाग करून तीन दरोडेखोर पकडले. तर चारजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

विशाल सुभाष बर्डे, वय 19 वर्षे, संदीप दिगंबर माळी वय 20 वर्षे, सागर अशोक बर्डे वय 22 वर्षे, सर्व राहणार बारागाव नांदूर, ता. राहुरी. असे पकडलेल्यांची नावे आहेत. तर भोंद्या उर्फ रवींद्र सूर्यभान माळी, अर्जुन भास्कर माळी, दोघे राहणार बारागाव नांदूर, ता. राहुरी. तसेच

इतर दोन अनोळखी इसम असे चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पकडलेल्या आरोपींकडून चार मोटरसायकली, सत्तूर, मिरची पूड, चाव्यांचा जूडगा असा एकूण एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा रजि. नं. 1035/2022 भादवि कलम 399, 402 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com