श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

नगरसह अन्य जिल्ह्यात दरोडे टाकणारा व स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणार्या टोळीतील कुख्यात दरोडेखोर श्रीगोंदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

विसापूर फाटा येथे जावेद घड्याळ्या चव्हाण (वय 35 वर्षे) रा.सुरेगाव ता.श्रीगोंदा याने व त्याचे इतर साथीदारांसह स्वस्तात सोने देतो म्हणून जळगाव जिल्ह्यातील पुरुष व महिलांना बोलावून या टोळीने त्यांच्यावर दरोडा टाकून त्यांचेकडील 3 लाख 15 हजारांची रोकड व सोन्यांचे दागीने लुटले होते.

बेलवंडी पोलीस हद्दीत स्वस्तात सोन्याचे आमिष देऊन लुटीचा हा गुन्हा दाखल झाला होता. या दरोड्यात आरोपी जावेद याच्या चार साथीदारांचा खून झाला होता. तेव्हापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होता. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून जावेद काळेसह, बबुशा चिंगळ्या काळे (वय 19) रा. वांगदरी यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे असणार्या दुचाकीबाबत चौकशी केली असता सदरची दुचाकी ही यवत वरून चोरी करून आणल्याची कबुली दिली.