दरोडेखोरांची आंतरजिल्हा सराईत टोळी जेरबंद

श्रीरामपुरातील कारेगाव, अशोकनगर व नगर तालुक्यातील दरोड्यांची कबुली || आरोपी नेवासा फाटा, गंगापूरचे || 9 लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व तवेरा गाडी असा ऐवज हस्तगत
दरोडेखोरांची आंतरजिल्हा सराईत टोळी जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील कारेगाव व अशोकनगर तसेच नगर तालुका येथील शेतावरील वस्तीवर जाऊन घरात प्रवेश व गंभीर दुखापत करून जबरी चोरी व दरोडा टाकणारी सराईत आरोपींची आंतरजिल्हा टोळी नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 9 लाख 75 हजार रुपये किमतीचे 11.5 तोळे (115 ग्रॅम) सोने व एक तवेरा गाडीसह असा ऐवज हस्तगत केला आहे.

दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी फिर्यादी निखील बाळासाहेब वाघ, वय 22, रा. वाघवस्ती, चारी क्र.11, कारेगाव, ता. श्रीरामपूर हे रात्रीचे जेवण करून दरवाजा, खिडक्या बंद करून कुटुंबियांसह झोपलेले असताना दरोडखोरांनी घरातील किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश करत चाकूचा धाक दाखवून कटावणी व लाथाबुक्यांनी मारहाण व जखमी केले.घरातील सामानाची उचका पाचक करुन 2 लाख 71 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन गेले. तसेच जाताना सचिन अरुण जगताप याचे बंद घराचा दरवाजा तोडुन कपाटातील 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 2 लाख 81 हजार हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.

जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस उपअधिक्षक नगर अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे, सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद मासाळकर, जालिंदर माने, सागर ससाणे, विजय धनेधर, रविंद्र घुंगासे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री भिटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती शिंदे, सारीका दरेकर, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे, बबन बेरड, संभाजी कोतकर व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकास रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक श्रीरामपूर, नेवासा परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके, यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही संशयीत इसम तवेरा गाडीमधून चोरीचे सोने विक्री करण्यासाठी औरंगाबादकडून अहमदनगरकडे येणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कटके यांनी सदर बातमीतील संशयीत इसमाची खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे जाऊन सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक तवेरा गाडी येताना दिसली.

पथकाची खात्री होताच गाडीस आडवे होऊन थांबण्याचा इशारा केला असता संशयीतांनी वाहनाचा वेग कमी करताच वाहनामध्ये बसलेले इसमांनी तवेरा गाडीचा दरवाजा उघडून पळून जाऊ लागले. पथकाने त्यांचा पाठलाग केला. परंतु ते मिळून आले नाही. त्याचवेळी पथकातील इतर अंमलदारांनी थांबलेल्या वाहनातील तीन जणांंना जागीच पकडुन यात आर्यन ऊर्फ एरीयल ऊर्फ काळु कांतीलाल काळे, (रा. नवापुरवाडी, ता. गंगापूर, जिल्हा औरंगाबाद),विदेश नागदा भोसले (रा. नवापुरवाडी, ता. गंगापूर, जिल्हा औरंगाबाद), भोईट्या ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे (रा. मानगल्ली, नेवासा फाटा) असे यांची नावे आहेत.

त्यावेळी ताब्यातील तवेरा गाडीची झडती घेतली असता ड्रावरमध्ये एक कापडी पिशवी मिळुन आली त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने मिळाले. मिळुन आलेल्या दागिन्याबाबत अधिक विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी श्रीरामपूर व नगर तालुका परिसरात घरात घुसून मारहाण करुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी जात असल्याचे कबुल केले. या आरोपीविरुध्द श्रीरामपूर शहर व तालुका तसेच नगर शहर व तालुका या ठिकाणी एकुण 04 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले असून या गुन्ह्यात जबरी चोरी झालेले 9 लाख 75, हजार रुपये किंमतीचे 115 ग्रॅम वजनाचे दागिने व एक तवेरा गाडीसह आरोपीचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांना मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com