दोन अट्टल दरोडेखोर गजाआड

एलसीबीची कामगिरी, चार दुचाकी हस्तगत
दोन अट्टल दरोडेखोर गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अट्टल दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डोंगरात पाठलाग करून पकडले. या टोळीने तीन दिवसांपूर्वीच सुपा येथे दरोडा टाकला होता. जावेद उर्फ जहीर घड्याळ्या चव्हाण (वय 25), महावीर घड्याळ्या चव्हाण (वय 23, दोघे रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा) अशी या अट्टल दरोडेखोरांची नावे आहेत. पकडलेल्या आरोपीकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सुपा शिवारात सोमवार, 18 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने सरिता सुनील निवडुंगे यांच्या कुटुंबियांना लोखंडी कटावनी व गजाने मारहाण करत सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम असा 78 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या पथकाला सदरचा दरोडा हा जावेद चव्हाण व महावीर चव्हाण यांच्या टोळीने टाकल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकातील सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार नाणेकर, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, संदीप पवार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रोहित येमूल, जालिंदर माने, प्रकाश वाघ, रवींद्र घुंगासे, मेघराज कोल्हे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव परिसरात सापळा लावून डोंगरामधून पाठलाग करत या दोघांना पकडले. त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दरोड्यांचे, घरफोड्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com