मोटारसायकल आडवी लावून तलवारीचा धाक दाखवत लुटले

लोणी पोलिसांनी पाठलाग करून लुटणार्‍यांना केली अटक; गुन्हा दाखल
मोटारसायकल आडवी लावून तलवारीचा धाक दाखवत लुटले

राजुरी |वार्ताहर| Rajuri

प्रवरानगर येथील तिसगाववाडी चौकातून लोहगाव येथे मोटारसायकलवरून आपल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या पिता-पुत्रास दुचाकी आडवी घालून तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडे असलेले दोन हजार रुपये रोख व मोबाईल असा ऐवज लुटला. तसेच दारूच्या बाटल्या त्यांच्या डोक्यात फोडून त्यांना जबर जखम केले. तसेच त्यांची दुचाकी या दोघांच्या अंगावर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहाता तालुक्यातील लोहगाव येथील अक्षय लहुजी खैरे (वय 25) व त्यांचे वडील लहुजी हिरामण खैरे हे दोघे त्यांच्या मोटारसायकलवरून प्रवरानगर येथील तिसगाववाडी चौकातून लोहगाव येथे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यादरम्यान मनीष सारसर, संकेत भोसले, ऋषिकेश उर्फ भैय्या सरोदे, अमर भोसले राहणार प्रवरानगर तालुका राहाता यांनी अक्षय खैरे याच्या दुचाकीला पल्सर मोटरसायकल रस्त्यात आडवी लावली. त्यानंतर तलवारीचा धाक दाखवून अक्षयकडील मोबाईल व दोन हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन अक्षयच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून जबर मारहाण केली तसेच पल्सर मोटरसायकल अक्षयच्या अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अक्षय लहुजी खैरे याने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 232/2021 प्रमाणे मनीष सारसर, संकेत भोसले, ऋषिकेश उर्फ भैय्या सरोदे, अमर भोसले यांचेविरुध्द भादंवि कलम 397 341, 34 प्रमाणे आर्म अ‍ॅक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीमार्फत मिळालेल्या माहितीनुसार लोणी पोलीस स्टेशनचे अंमलदार व तपास पथक यांनी प्रवरानगर परिसरात उसाच्या शेतात पाठलाग करून मोठ्या शिताफीने गुन्ह्यातील मनीष सारसर, संकेत भोसले, ऋषिकेश सरोदे यांना पकडण्यात यश आले. या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली लोखंडी तलवार तसेच चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com