शेवगाव शहर परिसरात रस्त्यांची दुरवस्था

शेवगाव शहर परिसरात रस्त्यांची दुरवस्था

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव शहरातून पैठण, गेवराई, पाथर्डी, नेवासा अशा चारही बाजूने जाणार्‍या हमरस्त्याची सध्या बिकट अवस्था झाली असून या प्रमुख रस्त्यावरून सुरू असलेल्या प्रवाशी व अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यावर जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, साईडपट्ट्यांची झालेली दुरवस्था यामुळे या रस्त्याने प्रवास करताना नागरिक, प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशांतून नाराजीचे व संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

तालुक्याच्या ग्रामीण परिसरातही विविध रस्त्यांची झालेली दुरवस्था व या रस्त्यांच्या डागडुजीच्या मागणीकडे संबंधितांचे होणारे दुर्लक्ष हा चिंतेचा विषय बनला आहे.

तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शिंदे वस्तीकडे जाणारा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अजूनच बिकट बनल्याच्या ग्रामस्थांतून तक्रारी आहेत.

दहिफळ नजीकच्या वाड्यावस्तीवरील चिमुकल्यांना मोठी कसरत करून शाळेला जावे लागण्याची वेळ आल्याने पालकांसह ग्रामस्थांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. शाळेतील मुलांना चिखल तुडवीत शाळेत जाण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी वेळोवेळी संबंधितांचे रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले मात्र अद्यापही हा रस्ता आहे त्याच अवस्थेत असल्याने तसेच याबाबत अजूनही अपेक्षित निर्णय झालेला नसल्याने ग्रामस्थांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com