अकोले (प्रतिनिधी) -

अकोले तालुक्यातील डांबरीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोल्हार-घोटी राज्यमार्गाचे काम पुढे होऊ देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव

विजयराव वाकचौरे यांनी दिला.

कोल्हार-घोटी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या विरोधात सुगाव बुद्रुक फाट्यावर कोल्हार-घोटी राज्यमार्गावर सुगाव, मनोहरपूर, कळस ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या मध्ये येणार्या ओढ्या नाल्यांवर सिडीवर्क तयार करावेत. बत्तीस गाव पाणीपुरवठा योजनेचे पाईप रस्त्यात गाडल्या, शेतकरी पुत्रांच्या समस्या संबंधित अधिकारी, ठेकेदार समजावून घेता अडबंग भूमिका घेत आहे. जोपर्यत अकोले संगमनेर महामार्गाचे कळस पर्यंतचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत पुढील काम होऊ देणार नसल्याचा इशारा राज्य सचिव विजयराव वाकचौरे, संजय वाकचौरे यांनी दिला आहे.

सुगाव येथील गाजरीचा ओहळ पुलाची उंची वाढवून भरावा करावा, तर कळस बु येथे पेट्रोल पंपानजीक असलेल्या पुलाची उंची वाढून वळण सरळ करावे जेणेकरून अपघात कमी होण्यास मदत होईल या मागण्या घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले मात्र सदर मागणीचे निवेदन स्वीकारण्यास तहसीलदार हजर न राहिल्याने आंदोलनकर्त्यानी तहसिलदार यांचेवर देखील रोष व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याच्या कामाला मंजुरी देताना सर्व प्रकारच्या तरतुदी केल्या आहे. चुकीच्या पद्धतीने काम होऊ देणार नसल्याचे भाजपाचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले. तर अकोले तालुक्यातील खडी, मुरुम मातीचे मोठ्या प्रमाणात उतखणणं होत आहे. अकोले तालुक्यातील काम पूर्ण झाल्याशिवाय अकोले तालुक्यातील खडी, मुरूम, वाळू, रेती कळसच्या पुढे जाऊ देणार नसल्याचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र गवांदे यांनी सांगितले.

या रस्तारोकोसाठी विकास वाकचौरे, सुगावचे माजी सरपंच रवींद्र जगदाळे, सुरेश शिंदे महेश माणिक देशमुख, मनोहरपूरचे माजी सरपंच बबन भांगरे, शेतकरी नेते सुरेश नवले, मधुकर देशमुख, शिवाजी देशमुख, बाळू उगले, बी. डी. देशमुख, तानाजी देशमुख, बाळासाहेब शिंदे वसंत भांगरे, अनिल देशमुख, विनेश देशमुख, सुभाष देशमुख यांच्या उपस्थित दोन तास चाललेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थीत होते. गाड्याच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तसेच या आंदोलनासाठी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता श्री. कडाळे, महसुल विभागाचे मंडलाधिकारी बाबासाहेब दातखीळे यांनी आंदोलनकर्त्यांना ठोस आश्वासन दिले तसेच प्रत्यक्ष साईटची पाहणी केली. लवकरच सबंधीत ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सुतोवाच विजयराव वाकचौरे व सुरेश नवले यांनी केले. अकोले पोलिस स्टेशनचे पीएसआय दीपक ढोमने यांनी चोख बंदोबस्त ठेवला.