रस्त्यांच्या कामासाठी अतिक्रमण हटविले

मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई
रस्त्यांच्या कामासाठी अतिक्रमण हटविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील काही रस्त्यांच्या कामासाठी (Road Work) भरीव निधी (Fund) प्राप्त झाला असल्याने या रस्त्यांच्या कामासाठी शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने (Municipal Anti-Encroachment Squad) शहरातील गुलमोहोर रोडवरील (Gulmohor Road) अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे.

शहरातील गुलमोहोर रोड (Gulmohor Road), शिलाविहार (Shilavihar), पाईपलाईन रोड (Pipeline Road), सिंधी कॉलनी परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी मध्यंतरी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तथापि त्यावेळी पावसाळा असल्याने कामे सुरू करण्यात आली नव्हती. आता महापालिकेने (Municipal Corporation) या कामाची पूर्वतयारी सुरू केली आहे. रस्त्यांच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी रस्त्याच्या बाजूने असलेली अतिक्रमणे हटविण्यास शुक्रवार पासून सुरूवात करण्यात आली.

मनपाच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने टपर्‍या, पत्र्याची शेडसह इतर अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. मनपाने अतिक्रमणधारकांना आधीच सूचना दिलेल्या असल्याने अनेक अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली आहेत. गुलमोहोर रोडपाठोपाठ ज्या इतर रस्त्यांची कामे होणार आहेत तेथेही अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com