रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास कर न भरण्याचा नागरिकांचा पालिकेला इशारा

रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास कर न भरण्याचा नागरिकांचा पालिकेला इशारा

राहाता |वार्ताहर| Rahata

येथील 14 चारी ते चाणखणबाबा या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना रस्त्यावरून जाण्या-येण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. नगरपरिषदेने पावसाळ्या पूर्वी तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा कर न भरण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

याबाबत प्रशासक चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून 14 चारी ते चाणखणबाबा या रस्त्याची अत्यंत वाईट दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणार्‍या येण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावरून दैनंदिन कामकाजात करिता नागरिकांना सातत्याने ये जा करावी लागते. रुग्णांना अ‍ॅम्बुलन्स मध्ये या रस्त्यावरून नेता येत नाही.

शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच पशुधनाचे दूध डेअरीत घालण्याकरीता नागरिकांना दुचाकी वरून जाण्याकरिता मोठ्या मुश्किलीने मार्ग काढावा लागतो. रस्त्याच्या दुरावस्थामुळे अनेकांना मणक्याचे आजाराच्या व्याधी सुरू झाल्या आहे. या रस्त्यावर खडीकरण व मुरमीकरण कारण्याची मागणी नगरपरिषदेकडे अनेकदा केली आहे. परंतु नागरिकांच्या मागणीला नगरपरिषद प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहेत.

प्रशासक चव्हाण यांनी या रस्त्याची पाहणी केली असून निधी उपलब्ध झाल्यावर या रस्त्याचे काम करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे; परंतु पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपल्याने रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर येथील नागरिकांना मोठ्या समस्येस सामोरे जावे लागेल. जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत पालिका प्रशासनाने या परिसरातील नागरिकांकडून कर आकारणी करू नये. निधी मंजूर होण्याची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ या रस्त्यावर मुरूम टाकून. नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर नानासाहेब बोठे, भाजपचे शहराध्यक्ष अनिल बोठे, भीमराज निकाळे, उदय बोठे, डॉ. सुरेश बोठे, अभिजीत बोठे, हनुमान बोठे, सुनील बोठे, विरेश बोठे, प्रकाश बोठे, रावसाहेब बोठे अजय आग्रे, अजय शिरसाठ, सनी शिरसाठ, पोपट शिरसाठ, मुरलीधर बोठे, संतोष बोठे, बाळासाहेब बोठे ,अशोक लांडगे, पोपट काळे, प्रवीण पैठणकर, भाऊसाहेब बनकर, दिनेश बर्डे, बाळासाहेब लांडगे यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून नगरपरिषदेकडे सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करुनही नगरपरिषदेने या परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कुठलीही उपाययोजना केल्या नाही. जोेपर्यंत पालिका प्रशासन येथील रस्ता दुरुस्तीचे काम करत नाही. तोपर्यंत या परिसरातील नागरिकांकडून कराची रक्कम वसूल करू नये.

- अनिल बोठे, भाजप शहराध्यक्ष राहाता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com