अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर-पाथर्डी-शेवगाव रस्ता, नगर-राहुरी-शिर्डी-कोपरगाव रस्ता व नगर-मिरजगाव-चापडगाव टेंभुर्णी रस्त्यांची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाल्याने व अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात असून सरकारच्या होणार्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी व ही कामे तत्काळ सुरू होण्यासाठी आमदार निलेश लंके व त्रस्त नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, क्षितीज घुले, घनश्याम शेलार, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, किसनराव लोटके, बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते.