खतांच्या सुधारित किमतीचा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक

खतांच्या सुधारित किमतीचा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक

अधिक दराने विक्री केल्यास कारवाई होणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरवाढीची दखल घेत केंद्र किमती कमी व्हाव्यात यासाठी सरकारने ङीएपी खतांच्या अनुदानात वाढ केली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे काल शुक्रवारी बैठक घेण्यात आली. त्यानंतर रासायनिक खत विक्रेत्यांनी अनुदानित रासायनिक खतांच्या सुधारित किंतीचा ठळक अक्षरात फलक दुकानात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले.

एवढेच नव्हेतर खत कंपन्यांनी जाहीर केलेल्या सुधारित किमतीपेक्षा अधिक दराने खत विक्री करून नये अन्यथा गुणनियंत्रक विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा पाऊस उत्तम असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यात खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतीत वाढ झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. या वाढलेल्या किमती कमी करण्याची मागणी होत होती. याची दखल घेऊन केंद्र सरकारने शेतकर्‍यांना कमी दरात खते मिळावीत यासाठी अनुदानात वाढ केली आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना जुन्याच दराने खते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाकडून बैठक घेण्यात आली. त्यात स्फुरदयुक्त खतांच्या वाढलेल्या अनुदानामुळे विक्री किमतीत घट होणार आहे. याबाबत चर्चा झाली. तसेच खत कंपन्या आणि विक्रत्यांना निर्देश देण्यात आले.

- खत कंपन्यांनी तातडीने खतांचे सुधारित दरांची स्वाक्षरीची प्रत संचालकांना तातडीने सादर करावी आणि ती प्रत माफदा व कंपनीचे खत विके्रत्यांना देण्यात यावी.

- खत कंपन्यांनी सुधारित किमती जाहीर कराव्यात.

- अधिक दराने खत विक्री होत असल्यास शेतकर्‍यांना तक्रार नोंदविण्यासाठी रासायनिक खत कंपनीच्या तक्रार निवारण कंद्राचा क्रमांक जाहीर करावा.

- खत कंपन्यांनी जो खत साठा खत विक्रेत्याकडे उपलब्ध आहे आणि त्याची दि. 20 मे 2021 नंतर विक्री होईल याबाबतच्या धोरणाची प्रत कृषी आयुक्तालयासह खत विक्रेत्यांना पाठवावी.

- दुकानदारानी सुधारित दराचा फलक दर्शनी भागात लावावा तसेच जादा दराने खत विक्री केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com