महसूल मंत्री पारनेरकरांना म्हणाले...

महसूल मंत्री पारनेरकरांना म्हणाले...

अहमदनगर (प्रतिनिधी) ahmednagar -

करोनाचा covid-19 फैलाव वाढल्याने शासन आणि प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या (health department) समन्वयाचा प्रयत्न वाढवला आहे. मंत्र्यांनीही जिल्ह्याकडे धाव घेतली असून आढावा बैठकीत स्थिती हाताळण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) गेल्या आठवड्यात उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी दक्षिण मतदारसंघातील तालुक्यांचा आढावा सुरू केला आहे.

शनिवारी सकाळी त्यांनी पारनेर (parner) येथे करोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तालुक्यात करोना निर्बंधांबाबत पारनेकरांनी दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले मात्र 30 एप्रिलपर्यंत शिस्त आणि निर्बंन पाळावे असे आवाहन केले.

यावेळी प्रशासनाने त्यांना उपाययोजनांची माहिती दिली. करोनासाठी आवश्यक ऑक्सीजन आणि औषधांचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल, अशी माहिती त्यांनी दिली. बैठकीला आ.डॉ.सुधीर तांबे, आ.निलेश लंके, जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, महसूल मंत्री दुपारी नगर येथील आढावा बैठकीनंतर सायंकाळी पाथर्डी-शेवगावचा आढावा घेणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com