शेवगाव : बैठकीस तहसीलदार अनुपस्थित

आ. मोनिका राजळे यांची वरिष्ठांकडे तक्रार
शेवगाव : बैठकीस तहसीलदार अनुपस्थित

शेवगाव |वार्ताहर| Shevgav

तालुक्यातील विविध कामांसदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीस तहसीलदार अर्चना पागिरे अनुपस्थित (Tehsildar Archana Pagire was absent from the review meeting) राहिल्याने आ. मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांचा पारा चढला. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त, महसूलमंत्री व जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार (Complaint) केली.

तालुक्यामध्ये लांबलेल्या पावसामुळे खरीप हंगाम (Kharif season) वाया जाण्याची परिस्थिती, आरोग्य सुविधा (Health facilities), लसीकरण (Vaccination), भविष्यात कोविडचा (Covid 19) प्रसार होऊ नये याकरिता उपायोजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, विविध विकास कामे तसेच महसूलमधील प्रलंबित कामे आदी विषयांवर तालुक्याची आढावा बैठक (Review meeting) आयोजित करण्याची सूचना प्रांताधिकारी देवदत्त केकाण (Prantadhikari Devdatta Kekan) यांना आ. मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांनी दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली.

त्यानुसार सर्व विभाग प्रमुख (Heads of all departments) तसेच प्रांताधिकारी देवदत्त केकाण बैठकीस उपस्थित राहिले. आ. मोनिका राजळे 2 दिवसीय अधिवेशनाचे कामकाज संपवून बैठकीसाठी पहाटे मुंबईवरून (Mumbai) निघाल्या व मीटिंगपूर्वी पोहोचल्या. या वेळी तहसीलदार अर्चना पागिरे(Tahsildar Archana Pagire) जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीस (Collector Meeting) नगरला गेल्याचे त्यांना समजले. मात्र त्यांनी केलेल्या चौकशीत अशी कोणतीही मिटिंग नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर नाराजी व्यक्त करत आ. राजळे यांनी तहसीलदारदारांच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त नाशिक विभाग व महसूल मंत्री यांना पाठवले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com