श्रीगोंदा तालुक्यात रेव्हेन्यू स्टॅम्पचा तुटवडा

श्रीगोंदा तालुक्यात रेव्हेन्यू स्टॅम्पचा तुटवडा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुकाभरात एक रूपयांच्या रेव्हीन्यू स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. श्रीगोंदयासह अनेक ठिकाणी एक रुपयांचे तिकिट सहा महिन्यापासून मिळत नाही .पोष्ट ऑफीस मध्ये गेल्यावर सहज उपलब्ध होणार्‍या तिकीटांचा तूटवडा असल्याने एक रुपयांचे तिकिट वेळप्रसंगी पाच रुपयांना काळया बाजारात घेण्याची वेळ नागरीकांवर आली आहे.

एक रुपयांचे पगाराचे तिकीट म्हणून सगळीकडे ओळख असलेल्या रेव्हेन्यू स्टॅम्प तिकिट रोजच्या व्यवहारात जनतेला गरजेचे असते. यात पगार करण्यापासून, कर्ज,करार यासह बहुतांशी ठिकाणी हे एक रुपयांचे तिकिट आवश्यक असते. एक रुपयांच्या रेव्हेन्यू स्टॅम्प दैनंदिन व्यवहारात लागत नाही असा एकही दिवस सामान्य नागरिकांचा जात नसताना श्रीगोंदा तालुक्यात मात्र या तिकीटांचा तुटवडा भासत आहे.

पोष्ट ऑफीस मध्ये गेल्यावर सहज मिळणारे तिकीट खाजगी व्यवसायिकाकडे विकत घेण्यासाठी एक रुपयांच्या तिकीटाला पाच रुपये देण्याची वेळ आलेली आहे. हे तिकिट पोष्ट ऑफीस आणि मुद्रांक विक्रेते यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध होते मात्र आता त्यांनी तिकीट वरूनच येत नसल्याचे कारण सांगत हात झटकले आहेत

पोस्टाचा करार संपला

राज्य सरकार आणि पोस्ट ऑफिस यांच्यातील करार मार्च 2022 मध्येच संपुष्टात आला आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकार आणि टपाल खाते यांच्यातील करार संपल्याने रेव्हेन्यू स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जो पर्यंत पुन्हा करार होत नाही तोपर्यंत नागरिकांना पोस्ट कार्यालयातून स्टॅम्प रेव्हेन्यू मिळणार नाही.असे पोष्ट ऑफीस मधून सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com