नगरच्या 26 महसूल अधिकारी-कर्मचार्‍यांचा सन्मान
सार्वमत

नगरच्या 26 महसूल अधिकारी-कर्मचार्‍यांचा सन्मान

‘महसूल’च्या ऑनलाईन कार्यक्रमात विभागातून तीन हजार अधिकारी-कर्मचार्‍यांचा समावेश

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

महसूल विभागात उत्कृष्ठ कामगिरी बजावणार्‍या जिल्ह्यातील 26 अधिकारी-कर्मचार्‍यांना मंगळवारी झालेल्या महसूल दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यात चार उपजिल्हाधिकारी, 4 तहसीलदार, 1 नायब तहसीलदार आणि अन्य कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने झाला. या कार्यक्रमाला नाशिक विभागातील 3 हजार अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. जिल्ह्यातील अधिकार्‍यांचा सन्मान नगरला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केला.

यावेळी महसूलमंत्री थोरात म्हणाले, महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा आहे. शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. करोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक विभाग व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साजरा करत असलेला ऑनलाईन महसूल दिनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.

कोव्हिडच्या काळात महसूल विभाग आपली भूमिका कार्यक्षमपणे पार पाडत असून राज्याचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यातील कोतवालांपासून ते अपर जिल्हाधिकारी असे सर्व साधारण अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी महसूल मंत्री थोरात, मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री भुसे, राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार महसूल विभागाला कौतुकाची थाप दिली आहे. कार्यक्रमात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून विभागीय आयुक्त राजाराम माने, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सर्वश्री सुरज मांढरे, संजय यादव, अभिजीत राऊत, राहुल द्विवेदी, डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे यांचेसह विभागातील सर्व जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी यांचेसह सर्व कर्मचारी आदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थित होते.

उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान झालेल्यामध्ये उर्मिला पाटील उपजिल्हाधिकारी महसूल, अनिल पवार उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, अर्चना नष्टे उपविभागीय अधिकारी कर्जत, गोविंद शिंदे, उपविभागीय अधिकारी शिर्डी. कुंदन हिरे तहसीलदार राहाता, शेख म.रफियोदिदन तहसीदार राहुरी, विशाल नाईकवाडे तहसीलदार जामखेड. योगेश चंद्र तहसीलदार कोपरगाव. शिल्पा पाटील नायाब तहसीलदार नगर. यशंवत कुसाळकर लघुलेखक उपविभागीय अधिकारी शिर्डी. फिरोज सय्यद, अव्वल कारकून, श्रीरामपूर उपविभाग, मंजुषा बागडे सामान्य प्रशासन शाखा नगर. परमेश्वर पाचारणे मंडल अधिकारी कर्जत. महेश आगळे निवडणूक शाखा लिपीक नगर, गणेश हुलमुखे शेवगाव तहसील, आबासाहेब पवार तहसील नगर, रत्नप्रभा गागरे तहसील संगमनेर, संदीप चाकणे तहसील कोपरगाव. बाळासाहेब बेल्हेकर पुरवठा शाखा नगर. सोमनाथ किरवे तहसील अकोले. शैलेश शिंदे श्रीगोंदा, रमेश बर्डे पाथर्डी, चंद्रकांत गवळी नेवासा (सर्व कोतवाल संवर्ग). नितिन पाटील तहसील राहुरी, सविता आढाव कोपरगाव, बाळासाहेब वाघमारे राहाता (पोलीस पाटील संवर्ग).

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com