वाळू उत्खननाबाबत 15 जानेवारीपर्यत सर्वंकष धोरण आणणार - मंत्री विखे पाटील

आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

वाळूच्या अवैध उत्खननास प्रतिबंधासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी पिंपळखुटा रोडवर असलेल्या 13 व 14 व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ, बारव पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक, तालुक्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री विखे पाटील बोलत होते.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, या धोरणामुळे अवैध वाळू उपसा करणार्‍यांना चाप बसेल. सामान्य नागरिकांना सरकारी डेपोतून रेती उपलब्ध होईल. याबाबत सर्व जिल्हाधिकार्‍यांना उत्खनन करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोणारमधील वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत अमरावतीच्या विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी केली जाईल. लोणारचे तहसीलदार यांच्याबाबत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीनंतर प्राप्त निष्कर्षाच्या आधारे संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com