तुमच्या धमक्यांना मी भित नाही; महसूलमंत्री विखे पाटलांचा थोरातांना इशारा

आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

गणेश कारखान्याची खुशाल चौकशी करा, तुमच्या धमक्यांना मी भित नाही, पण तुमच्यामागे काय लागणार आहे, हेही लक्षात ठेवा, आमची संस्कृती दिवे लावण्याची आहे, बंद करण्याची नाही, असा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार थोरात यांना दिला.

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर ना. विखे पाटील आले असते त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. ना. विखे पाटील म्हणाले, थोरातांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही. कारण फुकटचे श्रेय लाटण्याची पद्धत या संगमनेर तालुक्यात जुनीच आहे. वास्तविक संगमनेर चे रस्त्याचे काम हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने झाले. या रस्त्यावर जे पथदिवे लावण्यात आले ते काम देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण ते उद्घाटन करावे, त्यात आपण कुठेही हस्तक्षेप केला नाही.

आमची संस्कृती ही दिवे लावण्याची आहे. दिवे बंद करण्याची नाही, त्यामुळे त्यांना काय वाटते, हस्तक्षेप होतो काय? त्याच्याशी काय कर्तव्य नाही. केंद्रात भाजप सरकार आहे, राज्यात भाजप सरकार आहे, त्यामुळे रस्त्याचे उद्घाटन आपण करणार, त्यामुळे कुणाला काय वाटते याची आम्हाला चिंता नाही, असे खडेबोल राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना सुनावले.

35 वर्षे जे तालुक्याला पाणी देवू शकले नाही, त्यांनी घडवायच्या आणि मोडायची भाषा करु नये, राहाता तालुका टँकरमुक्त आहे, या तालुक्यात मात्र 25 ते 30 पेक्षा जास्त टँकर सुरु आहेत. हा एवढा मोठा फरक जनतेच्या समोर आहे. त्यामुळे तालुक्याला पाणी देण्याची जबाबदारी आता आमच्या सरकारची आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण करुन तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देणे ही आमची जबाबदारी असल्याने ती पूर्ण करणार असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com