खंडकरी शेतकर्‍यांच्या जमीन वाटपाचा प्रश्न 
तीन महिन्यांत निकाली काढू - ना. थोरात

खंडकरी शेतकर्‍यांच्या जमीन वाटपाचा प्रश्न तीन महिन्यांत निकाली काढू - ना. थोरात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) खंडकरी जमीन वाटपाचा प्रश्न (question of allotment of fragmented land) मार्गी लावला असून उर्वरित जमीन वाटपाचा प्रश्न तीन महिन्यांत निकाली काढण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी शिबिरे (Camps) घेऊन प्रसंगी खंडकरी शेतकर्‍यांशी वैयक्तिक चर्चेतून मार्ग काढण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केलेे.

येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात झालेल्या खंडकरी शेतकर्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale), शेती महामंडळाच्या उपमुख्य कार्यकरी अधिकारी मंदा लड्डा, प्रांताधिकारी अनिल पवार, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार प्रशांत पाटील, उपनगराध्यक्ष करण ससाणे (Deputy Mayor Karan Sasane), सचिन गुजर, इंद्रनाथ थोरात व्यासपिठावर उपस्थित होते.

महसूलमंत्री थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) म्हणाले, सर्व खंडकरी शेतकर्‍यांना जमिनी मिळाव्यात ही आपल्यासह सरकारची भुमिका आहे. या प्रश्नात आपण कोणतेही राजकारण करणार नाही. खंडकर्‍यांनी आपसातील वाद मिटवून घ्यावेत. आता परत या विषयावर आपण बोलणार नाही. शेतकर्‍यांनी थोडीशी तडजोड करून हा प्रश्न संपून टाकावा. जे मिळते, जे आहे ते स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात 53 प्रकरणे न्यायालयात तर 36 प्रकरणे खंडकरी शेतकरी स्तरावर प्रलंबित आहेत. व राहाता तालुक्यात 29 प्रकरणे न्यायालयात तर 28 प्रकरणे खंडकरी शेतकरी स्तरावर प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महसूल व शेती महामंडळ यांच्यात संयुक्त विद्यमाने शिबिर लावले जातील, त्यात ज्या शेतकर्‍यांना बोलावले जाईल, त्यांनी येऊन चर्चा करावी व प्रश्न मिटून घ्यावा, एक एकर क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांनाही जमिनी देण्याचा निर्णय घेणार असून शासन स्तरावर कोणतीही अडचण राहणार नाही, तीन महिन्यात जमिनी वाटपाचा प्रश्न निकाली काढू, असे त्यांनी स्पष्ट केले.

आ. लहू कानडे (MLA Lahu Kanade) म्हणाले, काही कुटुंब गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून शेती महामंडळाच्या जागेत घरे बांधून राहत आहेत. तर अनेक गावांना विकासासाठी जमीनी नाहीत. गावठाण व हद्द वाढीसाठी प्रस्ताव तयार करून शेती महामंडळाकडे सादर केला आहे, त्यात लक्ष घालावे, शेती महामंडळाचे वाड्यांवरील कामगारांना काम नाही. त्यांना इतर कोठे निवारा नाही. जागा नसल्याने घरकुलासाठी पात्र असूनही ते घरकुलाचा लाभ घेवू शकत नाही. हा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी विनंती आं कानडे (MLA Lahu Kanade) यांनी केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी जमिन वाटपाबाबतची माहिती दिली. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com