महसूल मंत्री अण्णांच्या भेटीला

महसूल मंत्री अण्णांच्या भेटीला

अहमदनगर | प्रतिनिधी

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली.

महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी कोरोना उपाययोजनांबाबत चर्चा केली. अण्णांनी यावेळी काही महत्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार निलेश लंके आदींसह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी नगर शहरानंतर राहाता, नगर ग्रामीण, कर्जत, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर आणि अकोले या तालुक्यात करोनाचा कहर कायम होता. 24 तासात पुन्हा 3 हजारांहून अधिक नवे करोना बाधित रुग्ण समोर आले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता साडे सतरा हजारांच्या पुढे गेली असून मृतांच्या संख्येतही 40 ने वाढ झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com