महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्याकडे केली 'ही' मागणी

- या वारसांना तातडीने मदत द्यावी
महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्याकडे केली 'ही' मागणी
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

करोनाच्या संकटात (Crisis of Corona) अनेक कुटुंबातील प्रमुख, अनेकांचे जवळचे नातेवाईक यांचे दुःखद निधन (Death) झाले आहे. त्यांच्या वारसांना (Heir) प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने (Central Government) दिले होते. मात्र बरेच दिवस झाल्यावरही केंद्र सरकारने (Central Government) अद्यापही पैसे दिले नसून केंद्र सरकारने तातडीने तीन लाख रुपये द्यावे व एक लाख रुपये राज्य सरकारने (State Government) द्यावी अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

या पत्राद्वारे नामदार थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी मागणी करताना म्हटले आहे की, राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना शिक्षण (Teaching), आरोग्य (Health) आणि इतर आवश्यक सेवांसाठी मूलभूत अधिकार दिलेला आहे. करोना महामारी (Crisis of Corona) मध्ये अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, अनेकांचे जवळचे नातेवाईक, मित्र यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. या सर्व मृत व्यक्तींच्या वारसांना केंद्र सरकारने भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Congress leader MP Rahul Gandhi) यांनी केली होती. यावरून केंद्र सरकारने मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

यातील 75 टक्के रक्कम म्हणजे तीन लाख रुपये केंद्र सरकार, तर 25 टक्के रक्कम म्हणजे एक लाख रुपये राज्य सरकार देईल असे निर्देश दिले होते. मात्र करोना काळात अनेक दिवस उलटून गेल्यानंतर हे अद्यापही ही मदत मिळाली नाही. सानुग्रह अनुदानतून 50 हजार रुपये आपत्ती निधीतून देण्यात येणारी मदत अतिशय तुटपुंजी आहे. कोविड १९ आपत्ती जाहीर करून केंद्र सरकारने अनेक कडक निर्बंध लावले यातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून भरभक्कम दंड वसूल करण्यात आले. अशा वेळी मृत व्यक्तींच्या वारसांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे.

केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थांवरील करातून लाखो करोडो रुपयांची कमाई करते आहे. आणि बड्या उद्योगपतींना कार्पोरेट टॅक्स मध्ये भरघोस सवलत देते आहे. मात्र करोना पीडितांना मदत द्यावयाला निधीची अडचण येते हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून या करोना वारसांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत मिळावी या करता राज्य सरकारचा असलेली एक लाख रुपये रक्कम अदा करण्याची हमी राज्य सरकारने द्यावी म्हणजे यातून केंद्र सरकारवर दबाव येऊन ते बाधित नागरिकांना व त्यांच्या वारसांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यास प्रवृत्त होतील असेही नामदार थोरात यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com