भाजप प्रदेशाध्यक्षांनी संकेत पाळावेत

मुख्यमंत्र्यांवरील टिकेप्रकरणी ना.थोरात यांचा सल्ला
भाजप प्रदेशाध्यक्षांनी संकेत पाळावेत

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रांताध्यक्ष आहेत, करोना संकटात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला त्याचं कौतुक देशात झालं आहे. आता ते आजारी आहेत. अशा वेळी त्यांच्यावर टिका करु नये, हे संकेत सर्वांनी पाळले पाहिजे, असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

45 दिवसापासून राज्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही, मुख्यमंत्र्यांचा चार्ज कुणाकडे तरी द्या, हवं तर आदित्य ठाकरेंकडे द्या, अशी टीका भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. याबाबत माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर ना. थोरात बोलत होते.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये गुप्त मतदाना ऐवजी आवाजी मतदान पद्धत घेण्याचे कारण काय? या प्रश्नावर ना. थोरात म्हणाले, अध्यक्षपदासाठी आम्ही काही विशेष निर्णय घेतले आहे. लोकशाहीमध्ये विशेषतः लोकसभेत ज्या पद्धतीने अध्यक्षपदाची निवड होते ती पद्धत आम्ही स्विकारली आहे. विधानपरिषदेच्या निवडीवेळी सुद्धा अशीच पद्धत आहे. देशातील अनेक राज्यात ती पद्धत स्वीकारलेली आहे. त्यामध्ये गुप्त मतदान पद्धत नाही. सोमवारी ही निवडणूक जाहीर होईल. काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी ते म्हणाले, काँग्रेस पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com