'समन्यायी' विरोधात लढत असताना गप्प का होते?

'समन्यायी' विरोधात लढत असताना गप्प का होते?

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आ. विखेंवर टीकास्त्र

संगमनेर (प्रतिनिधी)

करोना संकट असले तरी निळवंडे कालव्यांच्या कामांना निधी कमी पडणार नाही. कालवे होणार हे काहींना सहन होत नाही. त्यांच्या वक्तव्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. समन्यायी कायद्याविरोधात आम्ही लढत असताना 'हे' गप्प का होते? असा सवाल करून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता टोला लगावला. नैराश्यातून भूलथापा देण्याऐवजी जनतेची चिंता करावी, असा सल्लाही त्यांनी विखेंना दिला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५५ व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रतापराव ओहोळ होते. तर व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. रहाणे, गणपतराव सांगळे, शंकर पा. खेमनर, अमित पंडित, कवी बाबासाहेब सौदागर, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, सौ. मिराताई शेटे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, सौ. अर्चनाताई बालोडे, सुधाकर रोहोम, नवनाथ अरगडे, साहेबराव गडाख, अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, ॲड. सुहास आहेर, उपाध्यक्ष संतोष हासे, संपतराव डोंगरे, बाळासाहेब डांगरे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदार थोरात म्हणाले, आपण जनतेशी व विचारांशी कायम प्रामाणिक राहिलो. सर्व सामान्यांचा सर्वांगीण विकास हाच हेतू ठेवला. संगमनेर बद्दल सर्वत्र चांगले बोलले जाते. राज्यात आज मोठा मान मिळतो. हे सहन होत नसल्याने काही लोक बोलत असतात. त्यांना महत्व देण्याची गरज नाही. संगमनेर तालुक्यातील जनतेने कायम पाठबळ दिले. नेतृत्वाने विश्वास ठेवला. अत्यंत अडचणीत पक्षाची धुरा सांभाळली. आज महाविकास आघाडीत महत्वाचे स्थान आहे. हे जनतेचे श्रेय आहे. आपण कधीही कोणाचे वाईट चिंतले नाही. आपली ती संस्कृती नाही. सातत्याने इतरांना मदत केली. सर्व कारखाने चांगले चालावे व शेतकऱ्यांना मदत व्हावी, हा शुध्द हेतू आहे. म्हणून जिल्ह्यातील नेतेही सोबत आहेत.

२०१३ मध्ये संगमनेर बायपास झाला. भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांजवळ असणाऱ्यांनी शिर्डी- नगर रस्त्याची अवस्था पहावी. त्याचा नागरीकांना त्रास होतो, याबाबत चिंता करावी. नैराश्यातून भूलथापा देत जनतेच्या विष कालवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. संगमनेर हे सहकाराचे आदर्शवत मॉडेल आहे. शेतकरी जिज्ञासू व काटकसरीने प्रपंच करतो. तसा हा संगमनेरचा सहकार आहे. देशात या पॅटर्नची चर्चा आहे. आपण महसूल विभागात अनेक चांगले निर्णय घेतले. डिजिटल सातबारा आला. ई पीक पाहणी सुरु आहे. २०१६ पासून ई फेरफार मिळणार आहे. महाराष्ट्राचे हे महसूल मॉडेल देशासाठी आदर्शवत ठरणार आहे.

शेतकरी व कामगारांची दिवाळी आनंदी

यावर्षी करोनाचे संकट आहे. सर्वत्र आर्थिक मंदी आहे. मात्र कारखान्याने यावर्षी आपली परंपरा जपली असून दिवाळीत कामगारांना २० टक्के बोनस तर ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान आणि कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २०० रुपये प्रतिटन प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सभासदांना दिवाळीनिमित्त १५ किलो साखर मोफत देण्यात येणार असल्याचे नामदार थोरात यांनी सांगितले.

बाबा ओहोळ म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. याप्रसंगी रामदास वाघ, विष्णूपंत राहटळ, हौशीराम सोनवणे, सुरेश झावरे, सुरेश थोरात, माधवराव हासे, सुभाष सांगळे, निखील पापडेजा, सुदामराव सागर, शिवाजी जगताप, प्रा. बाबा खरात, दत्तात्रय खुळे, संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, संपतराव गोडगे, इंद्रजित खेमनर, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब कुटे, तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, संभाजी वाकचौरे, मंदाताई वाघ, मिराबाई वर्पे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com