जिल्ह्याचा निकाल 99.97 टक्के

अकोले, कोपरगाव, नेवासा आणि श्रीगोंद्यात 100 नंबरी कामगिरी
जिल्ह्याचा निकाल 99.97 टक्के

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल (Result of class X examination) काल शुक्रवारी दुपारी ऑनलाईन जाहीर (Online Announced) झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल (Ahmednagar District Result) 99.97 टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा हा निकाल चार टक्क्यांनी जास्त आहे.

प्रत्येक निकालात मुलांच्या तुलनेत मुली बाजी मारतात. मात्र, या निकालात मुले-मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जवळपास सारखेच आहे. विशेष म्हणजे मूल्यमापन पध्दतीने जाहीर झालेल्या निकाल जिल्ह्यातील अवघे 19 विद्यार्थी नापास (19 Student Faile) झालेले आहेत.

करोनाच्या नकारात्मक वातावरणात विद्यार्थ्यांच्या या निकालाने आनंदमयी वातावरण निर्माण झाले आहे.जवळजवळ सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

नगर जिल्ह्यातून मार्च 2021 या वर्षातील दहावीच्या परीक्षेसाठी 40 हजार 557 मुले व 30 हजार 32 मुली अशा एकूण 70 हजार 589 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु करोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मागील इयत्तेच्या अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. यात 40 हजार 555 मुले व 30 हजार 30 मुली अशा एकूण 70 हजार 585 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ते मंडळाकडे सादर केल्यानंतर 40 हजार 542 (99.96 टक्के) मुले व 30 हजार 24 (99.98 टक्के) मुली असे एकूण 70 हजार 566 (99.97 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मागील वर्षी (मार्च 2020) नगर जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला होता. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी 70 हजार 589 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातून प्रत्यक्षात परीक्षेसाठी 70 हजार 585 विद्यार्थी सहभागी होणार होते. मात्र, परीक्षा न झाल्याने अंतर्गत मुल्यमापनात 70 हजार 566 विद्यार्थी पास झाले असून 19 विद्यार्थी नापास झालेले आहेत.

वर्ग ही नाही, अन् परीक्षा नाही, तरी पास

यंदा करोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले गेले आहेत. त्यामुळे वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. करोना महामारीत दहावीच्या विद्यार्थ्याचे वर्षे आणि परीक्षा आगळीवेगळी ठरली आहे.

तालुकानिहाय निकाल

अकोले 100

कोपरगाव 100

नेवासा 100

श्रीगोंदे 100

जामखेड 99.95

कर्जत 99.88

नगर 99.98

पारनेर 99.97

पाथर्डी 99.95

राहाता 99.96

राहुरी 99.95

संगमनेर 99.95

शेवगाव 99.97

श्रीरामपूर 99.97

एकूण निकाल 99.97

निकालाची वेबसाईट हँग, रिफ्रेश करून विद्यार्थी संतापले

काल दुपारी एक वाजता अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र लाखो विद्यार्थी एकाच वेळी निकाल बघत होते. त्यामुळे बोर्डाची निकालाची क्रॅश झाल्याचे सांगण्यात आले. ज्या बोर्डाच्या वेबसाईटवर आपले गुण किती हे पाहण्यासाठी विद्यार्थी आतुर झाले होते. ती साईटच निकालावेळी क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणींना सामोरे जावे लागले. काही वेळानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरू झाली काही विद्यार्थ्यांनी त्यांचा निकालही बघितला. मात्र पुन्हा ही वेबसाईट डाउन झाल्याने विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे शिक्षकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, यावर आता शालेय शिक्षणमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त करत दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडवरुन ट्विट करत याची माहिती दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com