अहमदनगर : उद्यापासून थोडीशी ढिल

आयुक्तांचे आदेश । किराणा, चिकन, डेअरीसाठी 7 ते 11 ची वेळ
अहमदनगर : उद्यापासून थोडीशी ढिल
संग्रहित

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर शहरात करोना संसर्गाचे आकडे घसरत असल्याने महापालिकेने घालून दिलेल्या निर्बंधात थोडीसी ढिल दिली. उद्यापासून (दि.15) दूध डेअरी, किराणा दुकाने, चिकन-मांस विक्रीसोबतच भाजीविक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत परमिशन देण्यात आली आहे. बाकी खासगी अस्थापना मात्र 24 मेपर्यंत बंदच असणार आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी आज शुक्रवारी काढले आहेत.

2 ते 10 मे या काळात महापालिकेने नगर शहरात कडक लॉकडाऊन घोषित केला. या काळात फक्त पेट्रोलपंप, हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू होते. या कडक निर्बंधाची मुदत पुन्हा 15 तारखेपर्यंत वाढविण्यात आली होती. उद्या ही मुदत संपत असल्याने आयुक्त शंकर गोरे यांनी आज नवीन नियमावली जाहीर केली. 15 ते 24 मे या काळात ही नवीन नियमावली लागू असणार आहे.

या नियमावलीनुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीविक्री, अंडी, मटन विक्री सुरू असणार आहेत. मात्र या काळात दुकानदारांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 1 हजारापासून 10 हजार रुपयांपर्यतचा दंड आकरला जाणार आहे. दुसर्‍यावेळेस पुन्हा तीच चुक केली तर दुकान सील केले जाईल. खासगी अस्थापना मात्र बंदच असणार आहे.

करोना नियमांचे उल्लंघन केल्यास मटन, चिकन विक्रेते, कृषी केंद्रचालकांना 5 हजार, किराणा दुकानदारांना 10 हजार तर भाजीपाला, फळविक्रेत्यांना 1 हजार रूपये दंड केला जाणार आहे. दुसर्‍या वेळेसही नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडासोबतच दुकान सील केले जाईल. तर भाजीपाला, फळेही जप्त केले जाईल. भाजीपाला विक्री एका ठिकाणी बसून करता येणार नाही.

‘हे’ राहणार सुरू

हॉस्पिटल आणि मेडिकल

अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोलपंप

घरपोहच गॅस वितरण

सर्व बँका सुरू असतील

दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री ( 7 ते 11)

पशुखाद्य विक्री दुकाने (7 ते 11)

कृषीसेवा केंद्र (9 ते 4)

किराणा दुकाने (7 ते 11)

भाजीपाला,फळे विक्री (7 ते 11)

अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री (7 ते 11)

सर्व खासगी अस्थापना बंद

शहरातील कृषी केंद्र 4 वाजेपर्यंत

नगर शहरातील कृषी केंद्रासाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या काळात कृषीसेवा केंद्र सुरू राहतील. मात्र त्यांनाही कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस पाच हजार रुपये दंड केला जाईल. दुसर्‍या वेळेस पाच हजार रुपये दंड करण्यासोबतच दुकान सील केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com