अहमदनगर जिल्ह्यात निर्बंध ‘जैसे थे’
जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर जिल्ह्यात निर्बंध ‘जैसे थे’

जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट कमी, ऑक्सिजन बेडवरील रूग्ण संख्या अधिक

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाची रूग्णसंख्या कमी होत असताना अनेक जिल्ह्यात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु, नगर जिल्हा प्रशासनाने निर्बंध कायम ठेवले असून सकाळी 7 ते 11 यावेळत फक्त आवश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला, कृषी विषयक दुकानांना परवानगी दिली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी रात्री आदेश जारी केले आहेत. दरम्यान, जिल्ह्याचा कोविड पॉझिटीव्ह रेट 10 टक्क्यापेक्षा कमी असला तरी ऑक्सिजन बेडवरील रूग्णसंख्येचे एकुण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार आढावा घेऊन निर्बंधात बदल करण्यात येतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, 1 ते 7 मे दरम्रान असणारा जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा रेट 44 टक्क्र्ांवरून 22 ते 30 मे दरम्रान 8.46 पर्रंत खाली आणण्रात जिल्हा प्रशासन आणि आरोग्र विभागाला शक्र झाले आहे. रामुळे नगर जिल्ह्यातील करोना बाधितांच्रा संख्रेला जोरदार बे्रक लागला आहे. सोमवारी 31 मे रोजी आरोग्र विभाागाने 18 हजार 404 करोना चाचण्रा केल्रा होत्रा. त्रात 912 बाधित सापडले असून कालचा करोना पॉझिटिव्हचा रेट हा 4.85 असल्राचे जिल्हा आरोग्र विभागाकडून सांगण्रात आले.

जिल्ह्यात करोना रूग्णसंख्येत हळूहळू घट होत आहे. सोमवारी 912 करोना पॉझिटीव्ह रूग्ण समोर आले. रूग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथील करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले होते. परंतु, यासाठी आठवडाभरातील कोविड पॉझिटीव्ह रेट व ऑक्सिजन बेडवरील रूग्णसंख्या विचारात घेऊन स्थानिक प्रशासनाला यावर निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

यानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेऊन जिल्ह्यातील कोविड पॉझिटीव्ह रेट व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून आलेली जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडवरील रूग्णसंख्यावर चर्चा केली. जिल्ह्याचा आठवडा भरातील आयसीएमआर पोर्टवरील कोविड पॉझिटीव्ह रेट 10 टक्क्यापेक्षा कमी असला तरी ऑक्सिजन बेडवरील रूग्णसंख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शासनाने लागू केलेल्या निर्बंधानुसार जिल्ह्यात कडक केलेल्या निर्बंधाला मुदतवाढ देण्यात आली आहे. हे आदेश आज (मंगळवार) सकाळी सात वाजेपासून लागू करण्यात आले असून आवश्यकतेनुसार आढावा घेऊन निर्बंधामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

................

सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू असणार्‍या बाबी

किरकोळ विक्रीची किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, घरपोहच भाजीपाला व फळे विक्री, 24 मेच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार व उपबाजार समित्या, अंडी, मटन, चिकण व मत्स विक्री, कृषी संबंधीत सर्व दुकाने, पशुखाद्य दुकाने, पेट्रोल, गॅस विक्री सकाळी 7 ते 11 यावेळत सुरू असणार आहे.

...............

हे राहणार बंद

हॉटेल, रेस्टांरंट, बार यांना पिक सेवा देण्यास मनाई असेल, मात्र, होम डिलेव्हरी सुरू राहील, धार्मिक स्थळे पूर्ण बंद, आठवडे बाजार पूर्णने बंद, भाजीपाला-फळबाजारला व्दार वितरणास परवानगी, दारू दुकानातून व्दार विक्रीला परवानगी, चार चाकी खासगी वाहने अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहिल. दुचाकीवर दोघांना अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी, खासगी कार्यालय पूर्णपणे बंद, शासकीय कार्यालयात 15 टक्के हजेरी, कटींग सलून पूर्णपेणे बंद, शैक्षणिक संस्था आणि खासगी शिकवणी बंद, विवाह सभारंभास बंदी राहिल, चहाची टपरी दुकाने बंद राहतील, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद राहिल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com