राहुरी शहरात ‘महाराष्ट्र बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

राहुरी शहरात ‘महाराष्ट्र बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

उत्तर प्रदेशातील लखमीपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला राहुरी शहर व तालुक्यातील व्यापारी वर्गाने संमिश्र प्रतिसाद देत बंद पाळला.

उत्तर प्रदेशातील लखमीपूर खिरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेचा निषेध, केंद्राने शेतकरी विरोधी केलेले कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी या विरोधात राज्यातील महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. त्या पार्श्वभुमीवर राहुरी शहरातील अत्यावश्यक सेवां बरोबर फळे, भाजीपाला विक्रेते, चहाची हॉटेल व छोटे व्यावसायिकांची दुकाने सुरू होती. राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या आघाडीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्याांनी राहुरी बाजार समिती समोर एकत्र येऊन उत्तर प्रदेश भाजपा सरकार व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यकत केला.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, संजय पोटे, डॉ. जयंत कुलकर्णी, युवासेनेचे तालुकाध्यक्ष व देसवंडीचे सरपंच गणेश खेवरे, विजय शिरसाठ, बाळासाहेब गाडे, राष्ट्रवादीचे सुरेश निमसे, रवींद्र आढाव, नगराध्यक्ष अनिल कासार, महेश उदावंत, संतोष आघाव, सुनील मोरे, संदिप पानसंबळ, धिरज पानसंबळ, किशोर जाधव, सागर तनपुरे, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, अशोक आहेर, सुर्यकांत भुजाडी, प्रकाश भुजाडी, दिलीप चौधरी, गजानन सातभाई, अ‍ॅड. राहुल शेटे, राजेंद्र जाधव, राजेंद्र बोरूडे, विजय कातोरे, डॉक्टर सेलचे डॉ. प्रकाश पवार, प्रशांत शिंदे, मच्छिंद्र गुलदगड, नवाज देशमुख, दिलीप जठार, सुरेश काचोळे, विजय माळवदे आदी उपस्थित होते.

करोनाच्या संकटामुळे राहुरीच्या बाजारपेठेतील डबघाईस आलेली दुकानदारी आता कोठे थोडी सुरळीत सुरू झाली होती. उत्तर प्रदेशातील या घटनेच्या निषेधार्थ ‘ बंद’ मुळे अनेक व्यावसायिकांनी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.