
पारनेर (तालुका प्रतिनिधी)
निघोज प्रमाणे किन्ही बहिरोबावाडी येथील महिलांचा दारूबंदी साठी ग्रामसभा ठराव घेण्यात आला. दारूबंदी कार्यकर्ता शालुबाई साहेबराव साकुरे व गावच्या सरपंच पुष्पा सदाशिव खोडदे यांनी या कामी पुढाकार घेतला. किन्ही बहिरोबा वाडी गावात व परिसरात संपूर्ण दारूबंदी करावी या साठी गावातील महिलांनी ग्रामसभेचे आयोजन केले व त्या ग्रामसभेत संपूर्ण दारूबंदीचा ठराव करण्यात आला.
दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाल्याने महिला व तरुण मुलींना त्रास होत आहे,त्यामुळे गावात विक्री होत असलेली बेकायदा दारू विक्री पुर्णपणे बंद करण्याचे महिलांनी आज पारनेर येथे जाऊन पोलिसांना सांगितले. या महिला आज पारनेर पोलीस ठाण्यात गेल्या व गावातील दारू बंदी बाबत पोलिसांना अवगत केले. या अगोदर निघोज येथे कांताबाई लंके व सहकार्यांनी या बाबत लढा दिला. न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. शासन दरबारी विनंती केली तेव्हा कोठे न्याय मिळाला.
गावात दारू बंदी झाली. पन आजही काही ठिकाणी दारू विक्री होतच आहे. हॉटेल व घरांमधून ही दारू विक्री होत आहे. तर काही तळीराम बाजूच्या जवळा गावात जात आहेत. पोलिसांना या दारूबंदी कार्यकर्ता माहिती देतात व पोलीस कारवाई करतात. किन्ही गावच्या महिलांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. ग्राम सभेवर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत त्या मुळे त्यांनाही झालेला ठराव देण्यात आला.
पारनेर पोलीस ठाण्यात या वेळी सरपंच पुष्पा शिवाजी खोडदे, दारूबंदी कार्यकर्त्या शालुबाई साहेबराव साकुरे, मंगल खोसे, पुष्पा खोडदे, शोभा खोडदे, झुंबर साकूरे, कोमल व्यवहारे, मनीषा खोडदे, शारदा किणकर, शाळूबाई खरात, हर्षदा खोडदे, कुसुम खरात, रेश्मा खरात, मंगल साकुरे, रंजना खोडदे, लताबाई खोडदे, सिंधुबाई खोसे, झुंबराबई साकुरे, सुमन आतकर, लाहानुबाई खोसे, जयश्री खोडदे, सुरेखा खोडदे, मंदा खरात, मंगल खरात, शालुबाई खरात, ज्योती साकुरे, अश्विनी व्यवहारे, त्याच प्रमाणे उपसरंच हरेराम खोडदे, ग्र. प. सदस्य शरद व्यवहारे, जयश्री खोडदे रोहिदास खोडदे म. न. से.उप तालुका प्रमुख, सीताराम देठे, अशोक कीनकर, विजय खोडदे आदी उपस्थित होते.
या अगोदर कर्जुले हर्या गावातही काही आदिवासी भिल्ल समाजातील महिलांनी गावठी दारू विक्री बंदी साठी ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती. पण दारू विक्रेत्यांचे ग्रामपंचायत मध्ये वर्चस्व असल्याने ग्राम सभा घेता आली नाही. उलट ज्या महिला गावठी दारू बंदी करण्यास गेल्या त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना 40 ते 50 जणांनी बेदम मारहाण केली. तलवारी व कोयत्याने वार केले. त्यात अनेकजण गंभीर जखमी झाले.
शालुबाई साहेबराव साकुरे, दारूबंदी कार्यकर्ता