महिलांच्या पुढाकाराने खडकेवाकेत दारू व गुटखाबंदी ठराव मंजूर

महिलांच्या पुढाकाराने खडकेवाकेत दारू व गुटखाबंदी ठराव मंजूर

राहाता |वार्ताहर| Rahata

तालुक्यातील खडकेवाके (Khadkewake) गावातील महिलांनी (Woman) शुक्रवार 11 फेब्रूवारी रोजी विशेष ग्रामसभा (Gramsabha) घेऊन गावात दारूबंदी (Alcohol Ban) व गुटखा बंदीचा (Gutkha Ban) ठराव एकमताने संमत केला आहे. अशाप्रकारे महिलांची विशेष ग्रामसभा (Gramsabha) घेऊन गावातून दारूची (Alcohol) बाटली आडवी करणारी व गुटखा (Gutkha) पुड्या हद्दपार करणारी ग्रामपंचायत (Grampanchayat) म्हणून खडकेवाके ग्रामपंचायत (Khadkewake Grampanchayat) जिल्ह्यात पहिली ठरणार आहे.

किराणा दुकानांमधून वाईन विक्री बाबतचे शासन निर्णयाचा निषेध (Protest) व्यक्त करीत दारूबंदी (Alcohol Ban) व गुटखा बंदीचा (Gutkha Ban) ठराव ग्रामस्थ व महिलांनी विशेष ग्रामसभेत संमत करून गावातून दारूची बाटली आडवी करतानाच गुटखा पुड्याना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.

खडकेवाके येथे सरपंच सचिन मुरादे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. महिला भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. दारू व गुटख्यामुळे होणारे शारीरिक नुकसान तसेच उद्ध्वस्त होणारे प्रपंच, अन्याय, अत्याचार व गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, कर्जबाजारीपणा याचे मुख्य कारण दारू, व्यसनाधीनता असून त्यामुळे कुटुंबातील महिलांना मोठ्या त्रासाला व विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पा. व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी किराणा दुकानतून वाईन विक्रीस केलेला विरोध योग्य असून वाईन विक्रीबाबतचे शासनाचे धोरण भावी पिढीला उद्ध्वस्त करणार असल्याच्या संतप्त भावना महिलांनी व्यक्त केल्या.

खा. डॉ. विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या विचाराने प्रेरित होऊन सरपंच सचिन मुरादे यांनी दारूबंदी व गुटखाबंदीचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद व स्वागतार्ह असल्याच्या भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या. सुनीता मुजमुले, स्वाती लावरे, रोहिणी कौसे, सुनीता धनवटे, उपसरपंच वंदना गायकवाड, जालिंदर मुरादे, नवनाथ मुजमुले, व्हा चेअरमन जालिंदर मुरादे, शिक्षक नेते अरुण मोकळ, श्री. नळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सदस्य सचिन सुरासे, नवनाथ मुजमुले, सुनीता लावरे, कामगार पोलीस पाटील रावसाहेब लावरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश मुरादे, सर्व संचालक मंडळ तसेच सर्व महिला बचत गट सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. राधाकृष्ण विखे पा. व खा. डॉ. सुजय दादा विखे पा. यांच्या प्रेरणेतून गावात दारूबंदी व गुटखाबंदीचा निर्णय घेतला आहे घरातील कर्ते पुरुष मुले व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. म्हातारपणाची काठी म्हणून आधार वाटणारी मुले दारूमुळे आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खडकेवाके गावातील महिलांनी पुढाकार घेऊन सर्वानुमते दारूबंदी व गुटखा बंदीचा ठराव संमत केला आहे. ही चांगली बाब आहे. यापुढे गावात दारू विक्री अथवा गुटका विक्री करताना आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड केला जाईल. जिल्ह्यात सर्वात अगोदर गुटखा व दारूबंदीचा ठराव आमचं गाव करू शकले याचा अभिमान आहे.

- सचिन मुरादे, सरपंच

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com