आरक्षण फेरबदलामुळे राजकीय समिकरण बदलणार

आ. पवार- राम शिंदे यांच्यातील सामना रंगणार
आरक्षण फेरबदलामुळे राजकीय समिकरण बदलणार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायतच्या फेर आरक्षण सोडतीमध्ये काही प्रभागांमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होणार आहेत. दरम्यान, आ. रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायत निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोघांमधील राजकीय सामना चांगलाच रंगणार आहे.

कर्जत नगरपंचायतच्या 17 प्रभागांसाठी नगरपंचायतचे प्रशासक, प्रांताधिकारी अजित थोरबोले व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या उपस्थितीत फेर आरक्षण सोडत काढली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, सतीश पाटील, सुनील शेलार, संतोष मेहत्रे, सचिन घुले, प्रसाद ढोकरीकर, अमृत काळदाते, विनोद दळवी, अनिल गदादे ,काका ढेरे, नितीन तोरडमल, विशाल मेहत्रे, भूषण ढेरे, रामदास हजारे, विशाल काकडे, सोमनाथ भैलुमे, भास्कर भैलुमे, रज्जाक झारेकरी, ओंकार तोटे, राम ढेरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व नागरिक आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

यावेळी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचे दोन प्रभाग वगळता इतर 15 प्रभागाचे आरक्षण पुन्हा काढण्यात आले. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या वर्गातील एक जागा कमी झाली आहे. फेर आरक्षण कसे निघणार याविषयी इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. नगरपंचायतची मुदत संपून अनेक महिने झाले आहेत. दरम्यानच्या काळात, अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी अगोदरपासूनच केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com