डाऊच खुर्द शिवारातून गोवंश जनावरांची सुटका

डाऊच खुर्द शिवारातून गोवंश जनावरांची सुटका

कोपरगाव (प्रतिनिधी) / Kopargaon - डाऊच खुर्द शिवारात खडक वसाहत भागातील काटवनात कत्तलीसाठी गोवंश जातीची 20 लहानमोठी जनावरे लपवून बांधून ठेवलेली होती. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून 20 जनावरे ताब्यात घेऊन दोन आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

डाऊच खुर्द शिवारात कत्तलीसाठी 20 जनावरे डांबून ठेवल्याची माहिती मिळताच पो. नि. वासुदेव देसले, सहायक पोलीस निरीक्षक बी.सी.नागरे, सहायक फौजदार .एस.जी.ससाणे, पोकॉ राम खारतोडे,पो.कॉ. प्रकाश कुंडारे यांनी छापा टाकला असता तेथे एकूण 20 लहान मोठी गोवंश जातीची जनावरे लपवून व बांधून ठेवलेली मिळून आली. सदरची जनावरे युनूस सिकंदर शेख रा.खडकवसाहत डाऊच खुर्द, अकरम फकीर कुरेशी रा.संजयनगर कोपरगाव यांचे मालकीची असल्याची माहिती मिळाली.

सदरच्या गाई, वासरे,गोर्‍हे कत्तलीसाठी आणलेली आहेत असे समजले. नंतर आजुबाजुस शोध घेऊन वरील दोन्ही आरोपींना पकडून त्यांचे कब्जात सापडलेली 2 लाख 36 हजार रुपये किमतीची लहान मोठी 20 गोवंश जातीची जनावरांची वैद्यकीय तपासणी करून सदरची जनावरे गोकुळधाम गोशाळा कोकमठाण या ठिकाणी पाठविली आहेत.

सदर गुन्ह्याबाबत आरोपी युनूस सिकंदर शेख, अकरम फकीर कुरेशी यांचे विरुध्द कोपरगाव शहर पो.स्टे.मध्ये गुरनं 224/2021 प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधिनियम 1960 चे कलम 19(1) (एच) व महा.प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5(ब) व 9 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आलेली असून आरोपींना अटक केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com