खोल विहीरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

खोल विहीरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

करजगाव | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील गोमळवाडी येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याची सुटका वनविभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरूप काढत सुटका केली.

गोमळवाडी येथील बाबासाहेब गाडेकर हे सकाळी दहाच्या सुमारास शेतात गेले असता शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती वनविभागास दिली.

बिबट्या विहीरीत पडल्याची बातमी ग्रामस्थांना कळताच बघ्याची मोठी गर्दी झाली होती. वनविभागाच्या कर्मचा-यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला विहीरीतुन बाहेर काढले व पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करत पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com