सर्व जाती-धर्माचे लोक रिपाइंमध्ये यावेत यासाठी काम करणार

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांचे प्रतिपादन; नेवासाफाटा येथे स्वागत
सर्व जाती-धर्माचे लोक रिपाइंमध्ये यावेत यासाठी काम करणार

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

रिपाइं (ए) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आपलेच लोक पाय पकडून खेचण्याचा प्रयत्न करत असल्याने रिपाई वाढली नाही. त्यामुळे पक्षचिन्हही मिळालेले नाही. पुढच्या पिढीला न्याय देण्यासाठी रिपाई (ए) च्या माध्यमातून मला वेगळी भूमिका घ्यावी लागत आहे. सर्व जातीधर्माचे लोक रिपाई (ए) मध्ये आले पाहिजे यासाठी आपण काम करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी केले.

नेवासाफाटा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निकाळजे यांचे दलित बहुजन समाजाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.नेवासाफाटा येथील हॉटेल साईदर्शन मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुनील वाघमारे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.

दिपक निकाळजे हे राष्ट्रीय नेते असून दलित बांधवांसह सर्वसामान्य बहुजन समाज या संघटनेच्या माध्यमातून एकसंघ करण्याचे काम त्यांनी केले असल्याने विखुरलेला दलित बहुजन समाज आज त्यांच्या माध्यमातून एकत्रित येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व मराठा सेवा संघाचे रावसाहेब घुमरे यांनी निकाळजे यांचा सत्कार केला.

यावेळी आपली भूमिका विषद करताना दीपक निकाळजे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा हा पक्ष आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आपलेच लोक पाय पकडून खेचण्याचा प्रयत्न करत असल्याने रिपाई वाढली नाही त्यामुळे पक्षचिन्हही मिळालेले नाही. पुढच्या पिढीला न्याय देण्यासाठी रिपाई (ए)च्या माध्यमातून मला वेगळी भूमिका घ्यावी लागत आहे. सर्व जातीधर्माचे लोक रिपाई(ए) मध्ये आले पाहिजे यासाठी आपण काम करणार आहे.

पक्षाचा फायदा कसा होईल या दृष्टीने नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत उतरणार आहे. त्यासाठी इतर पक्षाशी युती करण्याचा प्रयत्न आपला प्रयत्न राहील. कार्यकर्त्यांवर खोटया केसेस टाकल्या जातात. यात जातीने लक्ष घालून कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी दलित बहुजन नेते अशोक गायकवाड, रिपाई (ए)चे राज्य सचिव अशोक ससाणे, राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हळ, उत्तर जिल्हाध्यक्ष राकेश कापसे, दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष सुनील वाघमारे, खेडले काजळीचे बाबासाहेब शिरसाठ, प्रदीप भालेराव, तालुकाध्यक्ष विजय शिरसाठ, उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ, अमोल मोरे, कार्याध्यक्ष दीपक गायकवाड, सुरेश घुंगासे, अमोल बनकर, संदीप सोनकांबळे, सचिव अमोल मोरे, संजय वाघमारे, प्रवीण गायकवाड, साईनाथ शिरसाठ, योगेश इंगळे, जितेंद्र पाटोळे, दिनेश निकुंभ, संदीप वाघमारे, संतोष मोरे, नितीन भालेराव, पप्पू मोरे, प्रियांका बेल्हेकर, भावराव चाबुकस्वार, निखिल साठे, कैलास कुंढारे, संदीप केंदळे, मेजर लक्ष्मण खंडागळे, राजेंद्र कसबे, विनोद ठोंबरे, राजन ब्राम्हणे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरवातीस निकाळजे यांनी आपल्या ताफ्यासह नेवासाफाटा येथील राजमुद्रा चौक येथे राजमुद्रास अभिवादन केले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील अशोक चक्र स्थळास पुष्पहार अर्पण करून वंदन केले तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

मंत्री आठवलेंवर निशाणा

भविष्यात रिपाई(ए)च्या माध्यमातून नगरसेवक आमदार, खासदार निर्माण होतील ते आमच्या हक्काचे असतील, ‘ते’ स्वार्थाचे होते; असे सांगून त्यांनी नाव न घेता आठवले यांच्यावर निशाणा साधला. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते हे दीपकभाऊ निकाळजे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com