काढा तण, वाचवा वन अभियानास सुरूवात

जिल्हा निसर्गप्रेमी, जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहचा उपक्रम
काढा तण, वाचवा वन अभियानास सुरूवात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा निसर्गप्रेमी (District Nature Lover) तथा जैवविविधता संशोधन (Biodiversity Modification) व संवर्धन समुह तसेच वनविभाग (Forest Department) नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काढा तण, वाचवा वन या अभियानास करंजी, (ता.पाथर्डी) येथुन नुकतीच सुरूवात करण्यात आली.

गर्भगीरी डोंगररांगांत करंजी घाट (Karanji Ghat) (ता. पाथर्डी) या ठिकाणाहुन कॉसमॉस (Cosmos) व टिथोनिया (Tithonia) अर्थात मेक्सीकन सुर्यफुल (Mexican Sunflower) या सुंदर दिसणार्‍या परंतु विदेशी घातक तण (Exotic weeds) वनस्पतींची झपाट्याने वाढ सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचे समुळ उच्चाटन करून गर्भगीरी डोंगररांगांची जैवविविधता अबाधित राखण्याच्या उद्देशाने ही मोहिम हाती घेण्यात आली होती. जिल्ह्यात वनांची वैविध्यपुर्णता टिकवण्यासाठी हाती घेतलेली ही पहिलीच मोहीम असुन यात वनविभाग व निसर्गप्रेमींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या विदेशी तण वनस्पती अल्पावधीत झपाट्याने पसरतात तसेच येथील स्थानिक व उपयोगी, औषधी वनस्पतींच्या (Medicinal Plants) जागा बळकावुन त्यांचे आस्तित्व संपुष्टात आणतात.

जनावरांच्या व वन्यप्राण्यांच्या चार्‍यासाठी उपयोगी असणारे गवताळ कुरणांची जागा व्यापुन टाकतात. त्यामुळे चरावू क्षेत्र कमी होते. ज्या ठिकाणी या वनस्पती वाढतात तेथील नैसर्गीक अन्नसाखळ्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होते. परिणामी तिथल्या मुळ वन्यपशु, पक्षी, किटक, वनस्पती यांची संख्या झपाट्याने घटु लागते. हळुहळु हे तण नजीकच्या शेतांमध्ये शिरून शेतकर्‍यांनाही हैराण करते. कॉग्रेस गवतापेक्षा भयावह असलेल्या या वनस्पती अत्यंत कमी पाण्यावर वाढतात. या वनस्पतींना जनावरे अथवा इतर प्राणी खात नाहीत अथवा या वनस्पतींवर वाढणारी किड आपल्या देशात आस्तित्वात नाही.या विदेशी तण वनस्पतींमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात धोके निर्माण होवु शकतात.

थोडक्यात या वनस्पतीचे दुष्परिणाम एखाद्या वनव्यापेक्षाही भयावह आहेत.या वनस्पतींचे वेळीच निमुर्लन केले तरच जिल्ह्याचे वैभव असणार्‍या गर्भगिरीची जैवविविधता अबाधित राहील. या एकदिवसीय तणनिर्मुलन उपक्रमासाठी जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी सुवर्णा माने यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.या मोहिमेत संदिप राठोड, जयराम सातपुते, अमित गायकवाड, राजेश काळे, राजेश काळे, छानराज क्षेत्रे, सचिन चव्हाण, वनविभागाच्या एकनाथ खेडकर, आदिनाथ पिसे, कविता दहिफळे, ज्योती शिरसाट छगनराव क्षेत्रे यांच्यासह अन्य सहभागी झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com