बापरे! 'रेमडेसिवीर'ची ३७ हजाराला विक्री; दोघांना अटक

वांबोरीचा मेडिकल चालक पसार
बापरे! 'रेमडेसिवीर'ची ३७ हजाराला विक्री; दोघांना अटक

अहमदनगर|Ahmedagar

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा काही लोक घेत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

१२ ते १८ हजार रुपयांना विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली. आता तब्बल ३७ हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहरात दोघांना अटक केली आहे.

ज्ञानेश्वर कौतुक हारपे (वय 21 रा. औरंगाबाद, हल्ली नागापूर एमआयडीसी), महेश नारायण कुऱ्हे (वय-26 रा. सावेडी, मुळ रा. हाजीपुर ता. शिरुर जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांनी हे रेमडेसिवीर इंजेक्शन वांबोरी (ता. राहुरी) येथील सुहास जगताप याच्याकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. जगताप पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक विवेक खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com