रेमडिसिवीरची मागणी जास्त अन् पुरवठा अपुरा

रेमडिसिवीरची मागणी जास्त अन् पुरवठा अपुरा

जिल्ह्यातील रुग्णालयाकडून अधिक प्रमाणात इंजेक्शनचा वापर : अन्न-औषधचा दावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मार्गदर्शन तत्वानुसार 10 टक्केच करोना रूग्णांना रेमडिसिवीर इंजेक्शनची आवश्यकता असते. परंंतू, जिल्ह्यातील रूग्णालयांकडून जास्त प्रमाणात इंजेक्शन लिहून दिले जातात, यामुळे सध्या पाच ते सहा हजार इंजेक्शनची गरज भासत आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी होत असल्याची माहिती औषध प्रशासनाचे अधिकारी कातकडे यांनी दिली.

जिल्ह्यात रेमडिसिवीरचा पुरवठा कमी होत आहे. उपलब्ध होणार्‍या इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व रुग्णालयांना यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये रुग्णालयांनी रुग्णांची माहिती देण्यात आलेल्या मेलवर नोंदवावी. त्यात रुग्णांचे तापमान किती आहे ?, सिटीस्कॅन स्कोर किती आहे ? यासह रुग्णांची परिस्थितीचा आढावा द्यावा आणि रुग्णांना किती इंजेक्शनची गरज आहे. याबाबत मेलमध्ये संबंधित रुग्णांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे.

मेलवर संकलित सर्व माहितीची छाननी केली जाते. यानंतर ऑक्सिजन बेड रुग्णांच्या प्रमाणात उपलब्ध साठ्याचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालय नियुक्त समिती करते. जिल्ह्यात पाच कंपन्यामार्फत करोना संबंधित औषधे उपलब्ध होत आहेत. साठ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होलसेलरकडून माहिती मागवली जाते. मागणीनुसार कोव्हिड रुग्णांची संख्या, गंभीर रुग्णाची संख्या याबाबत विचारणा करून, त्या प्रमाणात रेमडिसिवीर इंजेक्शन देण्याचे प्रमाण ठरवले जाते.

ती संबंधित यादी होलसेलर कडे जाते. त्या संबंधित रुग्णालयांना ते रेमडेसिवीर इंजेक्शन साठा उपलब्ध करून देतात. एकूण 40 ते 45 रुग्णालय व मेडिकल स्टोअर्स यांना कंपनीमार्फत इंजेक्शनचा पुरवठा होतो. जवळपास 20 औषध एजन्सीमार्फत ही इंजेक्शन उपलब्ध होत असल्याची माहिती कातकडे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com