करोनाकाळातील बंटी-बबली रूग्णांसाठी घोर

करोनाकाळातील बंटी-बबली रूग्णांसाठी घोर

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाटलीमध्ये सलाईनचे पाणी भरणारा श्रीरामपूरात अटकेत, आणखी किती मोकाट?

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

सध्या आपण करोनाशी दोन हात करत आहोत. ज्यांच्या घरात करोनाचे रूग्ण आहेत, त्यांची अवस्था सैरभर आहे. त्यात ज्यांनी ही परिस्थिती हाताळावी त्या नेत्यांनी राजकीय हुतूतू सुरू केला आहे. औषध, ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर बेडची वाणवा आहे. प्रशासनाचे या स्थितीवर नियंत्रण असल्याचे दिसत नाही. या काळात अनेक रूग्णालयात रूग्णांची पिळवणूक होत असल्याची तक्रारी सुरू असताना आता औधष तुटवड्याचा फायदा उचलून गरजवंतांना लुटणारे आणि बोगस औधष विकून फसविणारे बंटी-बबली सक्रीय झाल्याचे अलिकडील काही घटनांवर दिसून आले.

कालच श्रीरामपूरात एक धक्कादायक घटना समोर आली. डॉक्टरांनी वापरून कचर्‍यात फेकून दिलेल्या रिकाम्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाटलीमध्ये सलाईनचे पाणी भरून विकणाऱा मातापूर येथील तरुणास अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावली.

रईस अब्दुल शेख (20, रा. मातापुर ता.श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. शेख हा एक्स रे टेक्नीशियन म्हणून एका दवाखान्यात काम करतो.पोलिसांनी यापूर्वी रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणार्‍या दिनेश बनसोडे (रा. श्रीरामपूर, श्री कोविड सेंटर मेडिकल दुकान कर्मचारी) शुभम श्रीराम जाधव (कोल्हार, ता. राहाता) प्रविण प्रदीप खुने (भातंबरी, बार्शी) या तिघांना पकडले होते. हा काळाबाजार प्रकरणात एका डॉक्टरचा सहभाग आहे.

Title Name
औरंगाबादेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा  काळाबाजार 
करोनाकाळातील बंटी-बबली रूग्णांसाठी घोर

हे प्रकरण ताजे असतानाच पोलिसांनी आणखी एकास पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. करोना रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळवण्यासाठी वणवण भटकत आहे. त्याचा फायदा घेत श्रीरामपुरातील एका रुग्णाला रेमडेसिवीरची आवश्यकता असल्याचे शेख याला समजले.

रुग्णाच्या नातेवाईकाला रईस अब्दुल शेख याने संपर्क करून रेमडेसिवीर औषध देतो, त्यासाठी पंचवीस हजार रुपये लागतील, असे सांगितले. परंतु पेशंटच्या नातेवाईकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना ही माहिती सांगितली. पोलिसांनी सापळा रचून रईस शेख याला ओव्हर ब्रीज जवळ पकडले. त्याच्याकडून बनावट रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांनी जप्त केले.

Title Name
रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे द्रावण भरून विकणारी टोळी जेरबंद
करोनाकाळातील बंटी-बबली रूग्णांसाठी घोर

डॉक्टरांनी वापरुन कचर्‍याच्या डब्यात फेकून दिलेल्या रिकाम्या रेमडेसिवीर बाटलीमध्ये सलाईनचे पाणी भरून विकायचा. हा त्याचा पहिला प्रयोग होता, असे पोलिसांना सांगितले. श्रीरामपूर शहर पोलिसांनी शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे करत आहेत.

दरम्यान, राज्यात अशा घटना वरचेवर उघडकीस येत आहेत. दोन दिवसांपूर्वी रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पॅरासिटॉमॉलचे द्रावण करून भरणार्‍यांना पुणे पोलिसांनी जेरबंद केले होते. संकटाच्या काळात काहींनी सुरू केलेला हा फसवणूकीचा प्रकार प्रशासन कसा थांबवणार?

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com