केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्याने शेतकर्‍यांना दिलासा

केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्याने शेतकर्‍यांना दिलासा
युरिया खत

कोपरगाव (प्रतिनिधी) - करोनामुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झालेले होते त्यातच रासायनिक खत निर्मिती करणार्‍या कंपन्यांकडून खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले होते. मात्र केंद्र सरकारने शेतकरी हिताचा विचार करून रासायनिक खतांच्या किंमतीवरील अनुदानात वाढ करून खतांच्या किंमती कमी केल्याने शेतकर्‍याना दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनमुळे पिकविलेल्या मालाची विक्री कशी करावी या विवंचनेत असताना वारंवार बंद होत असलेल्या बाजार समित्यांमुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले असून उत्पादन खर्चही कसा निघेल यामुळे शेतकरी चिंचातूर झालेले होते. त्यातच रासायनिक खतांची निर्मिती करणार्‍या विविध कंपन्याकडून खतांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे त्यात भर पडली होती.

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या अनुदानात 140 टक्के वाढ करून शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकाने डी.ए. पी. खतांच्या अनुदानात प्रती बॅग रुपये 700 रूपयांनी ने वाढ करण्याचा निर्णय घेतला. इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर्स को-ऑपरेटीव्ह नवी दिल्ली या प्रमुख खत निर्मिती करणार्‍या कंपनीने रासायिक खतांच्या विविध ग्रेडच्या खतांच्या किंमतीमध्ये रुपये 100 रूपये ते 700 रुपये, प्रती बॅग कपात करून किंमती कमी केल्या आहे. आता एन.पी.के 10:26:26(50 किलो)1175 रूपये, एन.पी.के.12:32:16(50 किलो) 1185 रुपये, एन.पी.के. 20:20:0:13 (50 किलो) 975 रूपये, डी.ए.पी. 18:46:0 (50 किलो) 1200 रुपये, हे दर दिनांक 20 मे 2021 पासून लागू केलेले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com