कत्तलीसाठी आणलेल्या सात जनावरांची सुटका

चौघांवर गुन्हा दाखल
कत्तलीसाठी आणलेल्या सात जनावरांची सुटका

शेवगाव | शहर प्रतिनिधी

तालुक्यातील बोधेगाव येथील खाटीक गल्लीतील कत्तलखान्यावर शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने छापा टाकून तीन गायी आणि चार बैलांची मृत्युच्या दाढेतून सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांना गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीनुसार बोधेगाव येथे आठवडे बाजाराच्या दिवशी गुरुवारी जनावरांची कत्तल होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मुंढे यांनी विशेष पथकाला दिलेल्या आदेशावरून या पथकाने बोधेगाव येथील खाटीक गल्ल्तील कत्तलखान्यावर छापा टाकला असता, पत्र्याच्या शेड मध्ये तीन गायी व चार बैल किंमत एकूण ५२ हजार रुपये अशी सात जनावरे कत्तलीसाठी आणल्याचे आढळून आले.

या गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मास विक्रीसाठी आठवडे बाजारात आणण्यात येणार होते. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेवून गोवंशीय जनावरांची सुटका केली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी उमेश अर्जुन गायकवाड, यांच्या फिर्यादीवरून छोटू अब्बास शेख (वय ३२), समद चांद शेख (वय ४०) , सलीम अब्बास कुरेशी (वय ३०), कादरशहा इस्माईल कुरेशी (वय ३० सर्व राहणार बोधेगाव) यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित सन २०१५ चे कलम ५ (ब) (१) ९ व प्राण्यास निर्दयतेने वागवील्याने प्राणी संरक्षक अधिनियम कलम ३,११ प्रमाणे शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान बडधे हे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.