कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका

शहर पोलिसांची झेंडीगेट परिसरात कारवाई
कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका

अहमदनगर|Ahmedagar

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सुमारे 25 ते 30 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात शहर पोलिसांना यश आले.

आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास झेंडीगेट परिसरात शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कत्तलीसाठी शेडमध्ये जनावरे डांबून ठेवल्याची माहिती शहर उपअधीक्षक ढुमे यांना मिळाली होती. त्यांनी कोतवाली पोलिसांचे पथक सोबत घेऊन सदर ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com