संगमनेर | प्रतिनिधी

कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंश जनावरे घेवून जाणारी पिक अप जीप शहर पोलिसांनी संगमनेर ते खांडगावकडे जाणार्या रस्त्यावर पकडत जनावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी एका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एका पिकअप मध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंश जातीचे जनावरे घेवून जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संगमनेर ते खांडगावकडे जाणार्या रस्त्यावरील बोगद्याजवळ एम. एच. 13, आर 8004 या क्रमांकाची पिकअप जीप पकडली. यामध्ये गोवंश जातीचे 15 हजार रुपये किंमतीच्या 6 गायी एकूण 90 हजार रुपये, पिक अप वाहन 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत जनावरांची सुटका केली आहे. वाहनचालक अन्वर बाबू तांबोळी (रा. कोतुळ, ता. अकोले) हा फरार झाला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुनील उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अन्वर तांबोळी याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नबंर 19/2021 महाराष्ट्र गोवंश हत्या बंदी कायदा कलम 1995 सुधारीत 2005 ते कलम 5 अ, 1, 9, प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3,11 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धादवड करत आहे.