माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी जाळले पतीचे घर

दुहेरी हत्याकांड प्रकरण
माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी जाळले पतीचे घर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी शिवारात रामनवमीच्या दिवशी सकाळी बलराम कुदळे याने त्याची पत्नी अक्षदा व चार वर्षांचा मुलगा शिवतेज याची हत्या केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाईकांनी पतीचे घर जाळले. दरम्यान, याप्रकरणी कुणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी शिवारात पतीने पत्नीचा खून करून मुलाला शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास दिल्याच्या घटनेतील आरोपी बलराम दत्तात्रय कुदळे याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी शिवारात रामनवमीच्या दिवशी सकाळी बलराम कुदळे याने त्याची पत्नी अक्षदा व चार वर्षांचा मुलगा शिवतेज याची हत्या केली. तसेच या हत्येची माहिती नातेवाईकांना दूरध्वनीद्वारे कळविली. घटनेनंतर तो पोलिसांत हजर झाला. पत्नी अक्षदा व मुलगा शिवतेज यांचा खून केल्यानंतर आरोपीने चाकण येथील मेव्हुणा महेश बोरावके याला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती देत मृत्यूमुखी पडलेल्या पत्नी व मुलाचे मृतदेह दाखविले. तसेच त्यांचे फोटो काढून नातेवाईकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर टाकले. त्यानंतर तो पोलिसात हजर झाला. घडलेला घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, अक्षदा हिने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याचाच राग बालरामच्या डोक्यात अनेक दिवसांपासून होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचा संशय तालुका पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच बलराम हा लहानपणापासून जास्त बोलका नव्हता, तो फारसे कोणाशी बोलत नासायचा, असे त्याच्या शालेय मित्राकडून समजले. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच गोंधवणी येथील जीवन कुदळे यांचे घर जाळल्या प्रकरणी कोणीही तक्रार अद्यप दिलेली नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही. संबंधितांना तक्रार देण्याबाबत कळविले असल्याचे शहर पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले.

घटना घडल्यावर काल (ता. 10) मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपी पती भावाच्या घरात जळपोळ केल्याने परिसरात तनावाचे वातावरण होतेे.

Related Stories

No stories found.