रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाने काय केला युक्तीवाद?

पुढील सुनावणी कधी?
रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाने काय केला युक्तीवाद?

अहमदनगर|Ahmedagar

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला जामीन देण्यास सरकार पक्षांच्यावतीने प्रखर विरोध करण्यात आला. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी जामीन अर्जावर म्हणणे सादर केले. येथील जिल्हा न्यायालयात आरोपी बोठे याच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली.

अ‍ॅड. यादव यांनी युक्तीवादात सांगितले की, रेखा जरे यांना मारण्यासाठी दोनदा प्रयत्न झालेला होता. 30 नोव्हेंबर 2020 रोजी बोठे याने रेखा जरे व त्यांची आई सिंधूबाई वायकर यांना वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला पाठविले. त्यांचे जाताना आणि येताना लोकेशन सातत्याने घेऊन आरोपींना दिले. जातेगाव घाटात रेखा जरे यांचा दोघांनी गळा कापून निर्घृण खून केला. रेखा जरेचा खून झाल्यावर बोठे याने सुपारीचे 12 लाखांची रक्कम पिवळ्या बॅगेतून सागर भिंगारदिवे याला दिली. आरोपींमध्ये मोबाईलवर बोलणे झाल्याचे बोठे याच्या कार्यालय तसेच सागर याच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत दिसून येत आहे. सुपारीच्या रक्कमेपैकी सहा लाख 50 हजार रुपये भिंगारदिवे याच्या घरातून पंचासमक्ष हस्तगत करण्यात आले आहेत. बोठे याने रेखा जरेशी वितुष्ठ आल्याने शांत डोक्याने कट रचून खुनासाठी भिंगारदिवे व चोळके मार्फत पैसे पुरविले आहेत. बोठे याला कायदेशीर ज्ञान आहे. घटने अगोदर आणि त्यानंतरचे वर्तन लक्षात घेऊन जामीन देऊ नये, असे म्हणणे सादर करण्यात आले. आरोपी बोठेचे वकील अ‍ॅड. महेश तवले यांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. त्यावर आता 17 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com