बोठेच्या स्टँडिंग अर्जावर उद्या सुनावणीे

रेखा जरे हत्याकांड
बोठेच्या स्टँडिंग अर्जावर उद्या सुनावणीे

अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने पारनेर न्यायालयाने मंजूर केलेल्या स्टॅडिंग वॉरंटला

नगरच्या जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर शनिवारी (दि. 6) सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु, सरकारी वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत वाढवून मागितल्याने, आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी उद्या (मंगळवार) होणार आहे.

जरे हत्याकांडातील आरोपी बोठे गेल्या दोन महिन्यांपासून पसार आहे. जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे. बोठेच्या अटकेसाठी पोलिसांनी कायद्याचा आधार घेत आधी लूक आऊट नोटीस आणि नंतर स्टँडिंग वॉरंटला पारनेर न्यायालयातून मंजुरी घेतली आहे.

या स्टॅडिंग वॉरंटमुळे बोठेला देशभरातील पोलीस दिसेल तेथे अटक करू शकतात. मात्र, बोठे याच्यावतीने स्टॅडिंग वॉरंटलाच जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान, बोठे याच्या संपत्तीची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून नगर शहरातील काही मालमत्ता समोर आल्या आहेत. जिल्ह्यात इतर ठिकाणी व जिल्ह्याबाहेर बोठे याच्या नावावर आणखी किती मालमत्ता आहेत, याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com