अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (सोमवारी) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, हत्याकांडात अटक करण्यात आलेले आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांची न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने त्यांना रविवारी पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच आरोपी अटकेत आहेत. हत्याकांड प्रकरणी नाव आल्यानंतर पसार झालेला बाळ बोठे अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पोलिसांचे म्हणणे मागविले होते.

त्यानुसार तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी पोलिसांची बाजू सरकारी अभियोक्त्यांकडे सादर केली आहे. सरकारी अभियोक्ता आज पोलिसांची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहेत.

अटकपूर्व सुनावणीच्या वेळेस बोठे याला न्यायालयात हजर राहण्यास सांगा, अशा आशयाचा अर्ज पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवला आहे. त्या अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे इतक्या दिवसांपासून पसार असलेला बोठे हा न्यायालयात येणार का? हेही पाहणे महत्वाचे आहे.