बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांचा न्यायालयात अर्ज

पोलिसांचा न्यायालयात अर्ज
बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांचा न्यायालयात अर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे तीन महिन्यापासून सापडत नसल्याने त्याला

फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर लवकरच सुनावणी होईल अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगावच्या घाटात हत्या झाली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत पाच आरोपी तत्काळ जेरबंद केले. या आरोपींकडून बोठे याचे नाव समोर आले. बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हत्या झाल्यापासून बोठे पसार आहे. या हत्याकांडाला तीन महिने पूर्ण होत असून अद्यापही बोठे सापडलेला नाही.

दरम्यान, बोठे याने जिल्हा न्यायालयात व औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही ठिकाणी बोठे याला जामीन मिळालेला नाही. बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध पारनेर न्यायालयाकडून स्टॅडिंग वॉरंट मंजूर करून घेतले.

स्टॅडिंग वॉरंट काढूनही बोठे पोलिसांच्या हाती लागला नाही. तीन महिन्यापासून पोलिसांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. यामुळे भादवि कलम 82 अन्वये बोठे याला रेखा जरे हत्येप्रकरणी फरार घोषित करण्यात यावे, असा अर्ज पोलिसांनी पारनेर न्यायालयात दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com